शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

घरची लक्ष्मी बनली जमिनीची मालक, महिलांना मालमत्तेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी योजना 

By नितीन चौधरी | Updated: March 13, 2025 09:48 IST

दहा वर्षांच्या कालावधीमध्ये महिलांची संख्या तब्बल १५ लाखांनी वाढून त्यांच्याकडील एकूण क्षेत्रातही १५ लाख हेक्टरची वाढ झाली

पुणे :महिलांना मालमत्तेत सहभागी करून घेण्यासाठी राज्य सरकारने घराची तसेच जमिनीची मालकी महिलांच्या नावावर असल्यास अनेक योजनांमध्ये सतलती जाहीर केल्या आहेत. याचे प्रतिबिंब सध्या सुरू असलेल्या कृषी गणनेतही दिसून येत आहे. राज्यात २०१०-११ मध्ये झालेल्या कृषी गणनेत २० लाख महिलांकडे २५ लाख हेक्टर जमीन होती. त्यानंतरच्या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये महिलांची संख्या तब्बल १५ लाखांनी वाढून त्यांच्याकडील एकूण क्षेत्रातही १५ लाख हेक्टरची वाढ झाली आहे. यातून कुटुंबांमध्येही लक्ष्मीच्या नावावर जमीन करण्याकडे ओढा दिसून येत आहे.कोरोनामुळे २०२१-२२ मध्ये न झालेली कृषी गणना २०२४-२५ या आर्थिक वर्षात पूर्ण केली जात आहे. या कृषी गणनेत वैयक्तिक शेतकरी, सहमालकी असलेले शेतकरी, अनुसूचित जाती, जमातीचे शेतकरी, पुरुष व महिला, संस्था, कंपन्यांकडे असलेल्या शेतीचे मूल्यमापन केले जात आहे. राज्यात २०१०-११ या कृषी गणनेत २० लाख ५२ हजार ५१९ महिला शेतकरी असल्याचे दिसून आले होते. त्यांच्याकडे २५ लाख ८५ हजार २५३ हेक्टर जमीन होती. दहा वर्षांनंतर अर्थात सध्या सुरू असलेल्या कृषीगणनेनुसार महिलांची संख्या १५ लाखांनी वाढली आहे.सध्या राज्यात ३५ लाख १६ हजार ४९० महिला आहेत. दहा वर्षापूर्वी (२०१०-११) या महिलांकडे २५ लाख ८५ हजार २५३ हेक्टर जमीन होती. दहा वर्षांनी महिलांकडील जमिनीचे क्षेत्र जवळपास १५ लाख हेक्टरने वाढले आहे. राज्यात महिलांकडे ४१ लाख ४४ हजार १६२ हेक्टर जमिनीची मालकी आहे. पुरुषांची तुलना केल्यास राज्यात सध्या महिला शेतकऱ्यांपेक्षा पुरुष शेतकऱ्यांची संख्या तब्बल एक कोटींनी जास्त आहे. राज्यात सध्या १ कोटी ३५ लाख ६६ हजार ७९ शेतकरी असून महिलांची संख्या केवळ ३५ लाख १६ हजार ४९० इतकी आहे. दहा वर्षांपूर्वी राज्यात १ कोटी १६ लाख २१ हजार ३६९ पुरुष शेतकरी होते. तर महिला शेतकऱ्यांची संख्या २० लाख ५२ हजार ५१९ इतकी होती, असे सूत्रांनी सांगितले.

महिलांना मालमत्तेत सहभागी करून घेण्यासाठी आणि त्यांना समान हक्क देण्यासाठी मोठे प्रयत्न करण्याची गरज आहे. - विनयकुमार आवटे, संचालक, कृषी

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWomenमहिलाGovernmentसरकार