शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Pune: महिलेला 'इव्हिनिंग वॉक'पडला महागात, अज्ञातांनी चाकूचा धाक दाखवत उतरविले कपडे, दागिन्यांची केली लूट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 21:47 IST

Pune Crime News: बारामती शहरातील भिगवण रस्त्यालगत  राहणाऱया एका ३० वर्षीय महिलेला 'इव्हीनिंग वॉक' चांगलाच महागात पडला आहॆ .शहरातील  एमआयडीसी परिसरात पालखी मार्ग चौकात हि महिला सायंकाळी फिरण्यास गेली होती.यावेळी या महिलेला चाकूचा धाक दाखवत अर्धनग्न करीत दागिन्यांची लूट करण्यात आली.

 बारामती  - बारामती शहरातील भिगवण रस्त्यालगत  राहणाऱया एका ३० वर्षीय महिलेला 'इव्हीनिंग वॉक' चांगलाच महागात पडला आहॆ .शहरातील  एमआयडीसी परिसरात पालखी मार्ग चौकात हि महिला सायंकाळी फिरण्यास गेली होती.यावेळी या महिलेला चाकूचा धाक दाखवत अर्धनग्न करीत दागिन्यांची लूट करण्यात आली.२४जुलै रोजी हा धक्कादायक प्रकार घडला.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ,बारामती तालुका पोलिसांनी या प्रकरणी तिघा अज्ञातांविरोधात विनयभंगासह जबरी चोरी व अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ३० वर्षीय विवाहित महिलेने याबाबत फिर्याद दिली आहॆ .त्यानुसार  दि. २४ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास  पालखी मार्ग चौकात  चौकातील उड्डाणपुलाजवळ ती तासभर वाॅक करत होती. त्यावेळी डिव्हायडरजवळ एक व्यक्ति फोनवर बोलत होती. त्यानंतर लघुशंकेसाठी ही महिला एका ऊसाच्या पिकात गेली. त्यावेळी अनोळखी एक व्यक्ति तिच्या मागे तेथे आला. त्याने चाकू काढत तिच्या गळ्याला लावला.तसेच गळ्यातील काढ, अशी धमकी दिली. त्याला घाबरून तिने थांब काढून देते, असे सांगितले. तेवढ्यात आणखी दोन अनोळखी तरुण तेथे आले. त्यातील एकाने तिचे तोंड दाबून धरत तिचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. तिला तेथून थोड्या अंतरावरील विहिरीच्या कडेला असलेल्या ऊसाच्या पिकात नेले. तेथे चाकूचा धाक दाखवत तिच्याकडील सोन्याचे मंगळसूत्र, कानातील टाॅप्स, सोन्याची अंगठी असे १ लाख ५ हजारांचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले.

चाकू हातात असलेल्या युवकाने तिला कपडे काढण्यास सांगितले. तिने नकार दिला असता त्यांनी तिची अोढणी काढून बाजूला फेकून दिली. तिच्या अंगावरील टाॅप फाडून काढला. तिच्या अंगातील लेगीज पॅण्ट जबदस्तीने काढून फेकून दिली. त्यातील एकाने तिचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो काढत तिचा विनयभंग केला. त्यानंतर त्यातील एकाने या मोबाईलमुळे पुढे कुटाना होईल असे म्हणत तिचा मोबाईल तेथेच फेकून देत ते तेथून निघून गेले. २५ ते ३२ या वयोगटातील हे तिघे तरुण होते, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले  आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी