शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे: मित्रासह रिक्षाचालकाचा महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 14:06 IST

मित्राच्या मदतीने रिक्षाचालकाने महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली आहे.

ठळक मुद्दे मित्राच्या मदतीने रिक्षाचालकाने महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली आहे.रिक्षेमध्ये एकटी बसलेल्या महिलेला जबरदस्तीने कोंढव्यातील एका खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे- मित्राच्या मदतीने रिक्षाचालकाने महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली आहे. रिक्षेमध्ये एकटी बसलेल्या महिलेला जबरदस्तीने कोंढव्यातील एका खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी 23 वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली असून कोंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांचा एक साथीदार फरार आहे.  सतिश माने व बालाजी शिंदे अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला येरवडा येथिल राहणारी आहे. तिचा पती कोंढव्यात रहात असून त्यांचा घटस्फोट झाला आहे.  13 डिसेंबर रोजी संध्याकाळी तिचं भावाबरोबर भांडणं झालं, त्यामुळे ती घराबाहेर पडली व रिक्षाने एनआयबीएम रोडवर आली. पतीबरोबर संपर्क साधण्यासाठी तिने तेथील एका सोसायटीच्या वॉचमॅनकडे मोबाइल मागितला. पण त्याने दिला नाही. तेथून ती चालत जात असताना एक रिक्षा आली. त्यात बसून तिने कोथरूडला जायचे असे सांगितले. तिला एकटीला पाहून रिक्षा चालकाने मित्राला फोन करून बोलावून घेतले. वाटेत तो मित्र आला. त्याने जबरदस्तीने कोंढव्यातील सिध्दार्थ नगरमधील एका खोलीत नेले व त्या मित्राने तिच्यावर रात्रभर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर रिक्षाचालकाने पीडित महिलेला हडपसर येथील हांडे वाडी येथे एका खोलीत नेऊन दारु पाजली व तिच्यावर बलात्कार केला. 

त्यानंतर त्याने दुसऱ्या मित्राला बोलून घेतले व तिला सोडायला सांगितले. त्याने तिला कॅम्प परिसरात सोडलं. पीडित महिला येरवड्याला रात्री पायी जात असताना पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा तिने घडलेला हा प्रकार सांगितला.कोंढवा पोलिसानी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाRapeबलात्कारCrimeगुन्हा