शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

ॲम्बुलन्स, स्कूल बस अग्निशमन दलाची गाडीही अडकली;रस्ता अडवून इंदुरीकर महाराजांचा कार्यक्रम घेणाऱ्या आयोजकांवर कारवाई होणार का?

By किरण शिंदे | Updated: December 13, 2025 20:11 IST

संपूर्ण परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. रुग्णवाहिका, स्कूल बस, अग्निशमन दलाचे वाहन आणि इतरही शेकडो वाहन या वाहतूक कोंडीत तीन तास अडकून पडली होती.

पुणे - पुण्यात वाहतुकीचा प्रश्न बिकट आहे. अरुंद रस्ते आणि त्यात वाहनांची संख्या प्रचंड त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होत असते. मात्र शुक्रवारी पुण्यात इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनामुळे ३ तास वाहतूक ठप्प झाली होती. काळेपडळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील श्रीराम चौकात इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ठेवण्यात आलं, आणि यासाठी वाहतूक विभागाची कोणतीही परवानगी न घेता संपूर्ण रस्ता बंद ठेवण्यात आला होता. त्याचा परिणाम असा झाला की, या संपूर्ण परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. रुग्णवाहिका, स्कूल बस, अग्निशमन दलाचे वाहन आणि इतरही शेकडो वाहन या वाहतूक कोंडीत तीन तास अडकून पडली होती.{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/1582611979832122/}}}}पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला या वाहतूक कोंडी संदर्भातले कॉल केले. त्यानंतर त्या ठिकाणी दाखल झाले काळेपडळ वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव. वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे आधीच त्यांचा पारा चढला होता. आणि त्याला कारणीभूत समोर कीर्तनाचा कार्यक्रम असल्याचं लक्षात येताच त्यांनी आयोजकांना धारेवर धरलं. कुणाच्या परवानगीने तुम्ही रस्ता बंद केला असा प्रश्न त्यांनी विचारला. इतकंच नाही तर कीर्तन करणाऱ्या इंदुरीकर महाराजांनाही त्यांनी महाराज कार्यक्रम बंद करा असं सांगितलं. पोलीस अधिकाऱ्यांचा हा रुद्रावतार पाहून इंदुरीकर महाराजांनी काही काळासाठी कीर्तन थांबवलं. आणि त्यानंतर पोलीस अधिकारी प्रवीण जाधव यांनी हातात माईक घेत वाहतुकीची कोंडी कशी झाली हे उपस्थित लोकांना पटवून दिलं. आणि रस्ता रिकामा करण्यासाठी सांगितलं. तोपर्यंत आयोजक त्या ठिकाणी आले. पोलीस आणि आयोजकांमध्ये शाब्दिक चकमकही झाली.काळेपडळ वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी असलेले प्रवीण जाधव यांनी सांगितले की,आयोजकांनी वाहतूक विभागाची अथवा स्थानिक पोलिस स्टेशनची परवानगी न घेता कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांच्या कार्यक्रमाविषयी कोणालाही कल्पना नव्हती. श्रीराम चौकातील संपूर्ण रस्ता बंद करून हा कार्यक्रम सुरू होता. त्यामुळे सायंकाळी ५:३० ते रात्री ९ पर्यंत या संपूर्ण परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. या परिसरातील रस्ते जाम झाल्याचे मला अनेक नागरिकांनी फोन करून सांगितले. त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन मी आयोजकांना कार्यक्रम थांबवण्यास सांगितले. कार्यक्रम आठ वाजता संपल्यानंतर साडेनऊ पर्यंत वाहतुकीची कोणी तशीच होती. परवानगी न घेता कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा आशयाचं पत्र मी काळेपडळ पोलिसांना लिहिल्याचे जाधव यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Indurikar Maharaj's event blocks Pune road; ambulances, buses stuck.

Web Summary : Indurikar Maharaj's unauthorized kirtan in Pune caused a massive traffic jam. Ambulances and school buses were stuck for three hours. Police halted the event and are considering filing charges against the organizers.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी