मला न विचारता पाणीपुरी का आणली? दाम्पत्यामध्ये वाद; पत्नीची विष पिऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 04:39 PM2021-08-31T16:39:38+5:302021-08-31T16:41:50+5:30

पाणीपुरीवरून सुरू झालेला वाद टोकाला; विष पिऊन पत्नीनं जीवन संपवलं

in pune wife commits suicide after dispute over panipuri with husband | मला न विचारता पाणीपुरी का आणली? दाम्पत्यामध्ये वाद; पत्नीची विष पिऊन आत्महत्या

मला न विचारता पाणीपुरी का आणली? दाम्पत्यामध्ये वाद; पत्नीची विष पिऊन आत्महत्या

Next

पुणे: न विचारता पाणीपुरी आणल्यानं पती पत्नीमध्ये वाद झाला. वाद टोकाला गेल्यानं पत्नीनं विष पिऊन आत्महत्या केली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. प्रतीक्षा सरवदे असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. तिचा पती गहिनीनाथ सरवदे सध्या पोलिसांच्या अटकेत आहे. 

गहिनीनाथ सरवदे मूळचे सोलापूरचे रहिवासी आहेत. २०१९ मध्ये त्यांचा विवाह प्रतीक्षा यांच्यासोबत झाला. त्यांना एक मुलगा आहे. गहिनीनाथ उच्चशिक्षित असून एका मोठ्या कंपनीत कार्यरत आहे. लग्नानंतर गहिनीनाथ आणि प्रतीक्षा यांच्यात वाद सुरू होते. काही दिवसांपूर्वीच गहिनीनाथ यांनी प्रतीक्षा यांना पुण्यात आणलं होतं. ते दोघे आंबेगाव पठार परिसरात वास्तव्यास होते.

दोन दिवसांपूर्वी गहिनीनाथ यांनी ऑफिसवरून घरी येताना पाणीपुरी पार्सल आणली होती. मला विचारता पाणीपुरी का आणली, असा सवाल करत प्रतीक्षा यांनी त्यावेळी केला. यातून दोघांमध्ये वाद झाला. प्रतीक्षा यांनी पाणीपुरी खाण्यास नकार दिला. त्यानंतर प्रतीक्षा यांनी गहिनीनाथ कामावर जाताना त्यांना डबा नेण्यास नकार दिला. त्यामुळे प्रतीक्षा यांनी विषारी औषध प्राशन केलं. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास प्रतीक्षा यांची मृत्यूसोबत सुरू असलेली झुंज संपली. त्यानंतर प्रतीक्षा यांचे वडील प्रकाश पिसेंनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गहिनीनाथ यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी गहिनीनाथ यांना अटक केली. सध्या पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Read in English

Web Title: in pune wife commits suicide after dispute over panipuri with husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app