शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

Pune Water Supply : पालकमंत्र्याच्या नियुक्ती अभावी रखडले पाणी वाटपाचे नियोजन

By राजू हिंगे | Updated: December 10, 2024 16:49 IST

पुणे शहराला खडकवासला धरण साखळीतुन पाणी पुरवठा केला जात आहे.

पुणे : राज्यमंत्री मंडळाचा विस्तार १४ डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पालकमंत्र्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे पालकमंत्री नियुक्तीच्या सर्व प्रकियेला एक आठवडयापेक्षाही जास्त कालावधी लागणार आहे. त्यामुळे पालकमंत्री नसल्यामुळे कालवा समितीची बैठक होणार नाही. त्यामुळे पाणी वाटपाचे नियोजन रखडले आहे.पुणे शहराला खडकवासला धरण साखळीतुन पाणी पुरवठा केला जात आहे. पुणे महापालिकेने 23.34 टीएमसी पाणीसाठा आरक्षित करण्याची मागणी केली आहे. तथापि, जलसंपदा विभागाने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या मापदंडानुसार 12.82 टीएमसी पाणीवापर मंजूर केले आहे. प्रत्यक्षात पालिकेकडून वार्षिक सुमारे 17 टीएमसी इतके पाणी उचलले जात असल्याचा जलसंपदा विभागाचा दावा आहे.धरणातून पाण्याचा वाढीव कोटा मंजूर करण्याचे सर्वस्वी अधिकार हे राज्य शासनाला आहे, मात्र याकडे दुर्लक्ष होत असून मागील दहा वर्षांपासून फक्त आश्वासनांचा पाऊसच पुणेकरांच्या पदरी पडत आहे .राज्यसरकारने पाण्याचे प्राधान्यक्रम ठरविला आहे. यामध्ये पिण्याच्या पाण्याला पहिले प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानंतर शेती आणि उद्योग असा प्राधान्यक्रम ठरला आहे. खडकवासला प्रकल्पातील पाणी पुणे शहराला पिण्यासाठी वापरले जाते. तसेच दौंड, इंदापूर आणि बारामती या तीन तालुक्यांसाठी पिण्यासाठी आणि शेतीसाठी सोडण्यात येते. शहराला पिण्यासाठी आवश्यक पाणी, शेतीसाठी आवर्तने, बाष्पीभवन, काही ग्रामपंचायती आदींचा विचार करून पाण्याचे नियोजन आतापासून करण्याची गरज आहे. मागील काही वर्षांपासून पावसाचे आगमन उशीरा होत असल्याचे दिसून येते. जून महिन्यापर्यंत समाधानकारक पाऊस पडत नाही. त्यामुळे धरणात अपेक्षित असा पाणीसाठा उपलब्ध होत नाही. त्यामुळे जून महिन्यातही पाणी कपातीची टांगती तलवार कायम राहते.साधारणपणे ऑक्टोबरमध्ये होत असलेल्या कालवा समितीच्या बैठकीत पाणी वाटपावर चर्चा होते. 15 ऑक्टोबरला धरणात उपलब्ध असलेला पाणीसाठा विचारात घेऊन पिण्यासाठी आणि शेतीसाठी नियोजन करण्यात येते. यावर्षी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने कालवा समितीची बैठक झाली नाही. आता राज्यात सत्तास्थापना झाली असून पाणी नियोजनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पालिकेचे पंपिंग स्टेशन जलसंपदा विभागाच्या ताब्यात द्यावेपुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यामध्ये पाण्यावरून सुरू असलेली तू तू मैं मैं यापुढील काळात अधिकच वाढण्याची शक्यता आहे. शहराच्या पाण्यावर महापालिका नियंत्रण ठेवत नसल्याने खडकवासला धरणातून दिला जाणाऱ्या पाण्याचा अतिवापर महापालिकेकडून होत असल्याची तक्रार अनेकदा जलसंपदा विभागाकडून करून पाण्याचा अधिक वापर करण्याचे खापर महापालिकेवर फोडले जाते. त्यातच आता जलसंपदा विभागाने महापालिकेशी पत्रव्यवहार करत महापालिकेच्या पंपिंग स्टेशनबाबत मोठी मागणी केली आहे.‘पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेचे पंपिंग स्टेशन जलसंपदा विभागाच्या ताब्यात द्यावे,’ असे पत्र खडकवासला पाटबंधारे विभागाने महापालिकेला पाठविले आहे. मात्र, महापालिकेने अद्याप यावर कोणताही निर्णय घेतला नसल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.   

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीMuncipal Corporationनगर पालिका