शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Pune Wall Collapse : दुर्घटनेची पूर्व कल्पना असूनही दुर्लक्ष; पोलीस तपासात उघड       

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 02:00 IST

पुण्यातील कोंढव्यातील आल्कन स्टायलस या इमारतीची संरक्षक भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देयाप्रकरणी एकूण 8 जणांवर गुन्हा दाखल वारंवार लेखी, तोंडी, ई मेलद्वारे तक्रारी, तरीही बिल्डरने प्रतिबंधात्मक उपाय योजना नाही

पुणे : अ‍ॅल्कॉन लँडमार्कसची संरक्षक भिंत ही कमकुवत असून तिला भेगा पडलेला आहेत, त्यामुळे ती कोसळू शकते, याची कल्पना असूनही बांधकाम व्यावसायिक जगदीशप्रसाद अगरवाल, विवेक सुनिल अगरवाल यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे़. पुण्यातील कोंढव्यातील आल्कन स्टायलस या इमारतीची संरक्षक भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एकूण 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत कोंढवा पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामधून हे समोर आले आहे़. अ‍ॅल्कॉन लँडमार्कस चे भागीदार जगदीशप्रसाद अगरवाल व इतर ४ जणांनी २०११ मध्ये ही सोसायटी विकसित करण्यास घेतली होती़. ती जानेवारी २०१९ मध्ये इमारत बांधून पूर्ण करण्यात आलेली आहे़. त्यामुळे बांधकामाची तसेच त्याच्या चांगल्या दर्जाची जबाबदारी ही अ‍ॅल्कॉन लँडमार्कसच्या भागीदारांवरच येते़. तसेच हे बांधकाम मजूर राहत असलेली जागेमध्ये बांधकाम विकसन करणारे कांचन या संस्थेचे भागीदार पंकज व्होरा, सुरेश शहा व रश्मिकांत गांधी हे इमारत उभारत आहेत़. त्यांनी कांचन बिल्डर्सचे साईट इंजिनिअर, साईट सुपरवायझर व लेबर कॉंट्रक्टर यांनी बांधकामावर काम करणाऱ्या कामगारांची राहण्याची कोणतीही सुरक्षित व्यवस्था केलेली नसल्याचे दिसून आले आहे़. त्यांनी जाणून बुजून हलगर्जीपणा केलेला आहे़ .अ‍ॅल्कॉन लँडमार्कस चे बिल्डर विवेक सुनिल अगरवाल व त्यांचे इतर ४ भागीदार यांना सोसायटीमधील रहिवासी, फ्लॅटधारकांनी इमारतीच्या कम्पाऊंडच्या पडलेल्या भेगा दुरुस्त करणे अथवा मजबूती करण्याच्या दृष्टीने वारंवार लेखी, तोंडी, ई मेलद्वारे तक्रारी केल्या़ तरीही बिल्डरने प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या नाही. त्यामुळे जीवितास धोका निर्माण केला असल्याचे सोसायटी सभासदांनी पोलिसांनी सांगितले आहे़. संरक्षक भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे तसेच बांधकाम मजुर राहत असलेल्या सर्व्हे नंबर १८ मधील जागेमध्ये बांधकाम करणाऱ्या कांचन संस्थेचे भागीदार पंकज व्होरा व त्यांच्या इतर भागीदारांनी मजुरांना असुरक्षित व धोकादायक ठिकाणी राहण्यासाठी तात्पुरते पत्र्याचे खोल्या बांधून दिल्यामुळे ही दुर्घटना झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़. 

टॅग्स :KondhvaकोंढवाBuilding Collapseइमारत दुर्घटनाDeathमृत्यू