शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Pune Unlock : पुणेकरांना मोठा दिलासा ; दुकाने, हॉटेल आणि इतर सेवा 'अशा'प्रकारे राहणार सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 19:33 IST

पुणे शहर हे नवीन नियमावली मध्ये दुसऱ्या टप्प्यात असणार आहे. या संबंधीची नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे

पुणे : राज्य सरकारने 'ब्रेक दि चेन' अंतर्गत निर्बंध शिथिल करण्याबाबत पाच टप्पे तयार करण्यात आले असून त्यानुसार निर्बंधांमध्ये बदल होऊन त्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे.  मात्र, आता पुणे शहरातील पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांवर आल्याने पुणे शहराला दिलासा मिळाला आहे.

पुणे शहर हे नवीन नियमावली मध्ये दुसऱ्या टप्प्यात असणार आहे. या संबंधीची नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले आहे. येेेत्या सोमवार (दि.१४) पासून या निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या नवीन नियमावलीनुसार पुण्यात संध्याकाळी ७ पर्यंत सर्व प्रकारची दुकाने सुरु राहणार असून मॅाल, मल्टिप्लेक्स सिनेमागृह आणि थिएटर हे मात्र बंद असणार आहे. शहरातील विकेंड लॉकडाऊन मात्र कायम ठेवण्यात आला आहे. शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील पुण्यातील कोरोना आढावा बैठकीत निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर पुणेकरांना आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागच्या वेळी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराबाबत वेगळे धोरण स्वीकारले जाणार असल्याची घोषणा पवार यांनी केली होती. त्याच धर्तीवर पुण्यात अनलॉक होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, पुणे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट हा ५.१६ टक्के इतका असल्यामुळे पुणे शहराचा तिसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला होता. आणि या टप्प्यातील निर्बंधांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

कोरोनाचा संसर्ग राज्यात सारखा नाही. त्याची तीव्रता कमी-जास्त आहे हे लक्षात घेऊन एकीकडे या विषाणूची साखळी तोडणे आणि दुसरीकडे आपले आर्थिक, टप्पे सामाजिक दैनंदिन व्यवहार शिस्तबद्धरित्या सुरु कसे होतील हे पाहणे एवढ्याकरिता निर्बंधांच्या ५ टप्पे ठरविण्यात आले आहेत. हे टप्पे निश्चित करण्यासाठी ऑक्सिजन बेडसची दैंनदिन उपलब्धता आणि साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर हे निकष गृहीत धरण्यात आले आहे.

अशी आहे नवीन नियमावली... 

*दुकाने सकाळी ७  ते संध्याकाळी ७* हॉटेल्स सकाळी ७ ते रात्री १० (पार्सल रात्री ११ पर्यंत) 

* अत्यावश्यक सुविधा वगळता इतर दुकाने शनिवारी ,रविवारी बंद* संचारबंदी रात्री १० पासून* उद्याने सकाळी ५ ते ९ व संध्याकाळी ४ ते ७* Outdoor स्पोर्ट्स ,क्रीडांगणे सकाळी ५ ते ९ , संध्याकाळी ५ ते ७ * अभ्यासिका, वाचनालये ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ७ पर्यंत* राजकीय,सामाजिक ,सांस्कृतिक कार्यक्रम ५० लोकांसह संध्याकाळी ७ पर्यंत परवानगी * लेव्हल 5 असलेल्या ठिकाणी जायचं तर ई पास आवश्यक* शासकीय कार्यलये १०० टक्के क्षमतेने सूूरु* खाजगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तcorona virusकोरोना वायरस बातम्याState Governmentराज्य सरकारAjit Pawarअजित पवार