पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सुस्तावलेल्या परीक्षा विभागाने अखेर गुरुवारी तातडीने कार्यवाही करून परीक्षेला उपस्थित असतानाही गैरहजर दाखविण्यात आलेल्या एमआयटी इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत बदल करून दिला. त्याचबरोबर खेड शिवापूरच्या स्कूल आॅफ आर्किटेक्चर मधील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत बदल करून देण्याची कार्यवाही रात्री उशिरपर्यंत सुरू होती.मुंबई विद्यापीठाकडून पेपर तपासणीमध्ये झालेला गोंधळ गाजत असतानाच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागाचा नाकर्तेपणा उजेडात आला होता. स्कूल आॅफ आर्किटेक्चर कॉलेजचे १४० व एमआयटी इंजिनिअरिंग कॉलेजच्या ११ विद्यार्थ्यांना परीक्षेला उपस्थित असतानाही गैरहजर दाखवून नापास करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला होता. गंभीर बाब म्हणजे, ते विद्यार्थी परीक्षा विभागात गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन परत पाठविण्यात आले होते. यापार्श्वभूमीवर गुरूवारी परीक्षा विभागाचा हा हलगर्जीपणाचे वृत्त प्रकाशित होताच प्रशासनाला खडबडून जाग आली.परीक्षा विभागाच्या एकूणच कार्य पद्धतीबाबत विद्यार्थ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कुलगुरू नितीन करमळकर यांनी याप्रकरणामध्ये लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. विद्यार्थी संघटनांकडूनही याप्रकराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. परीक्षा विभागाच्या चुकीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले होते. एमआयटीच्या काही विद्यार्थ्यांना एमबीएला प्रवेश घ्यायचा होता, तर काही विद्यार्थ्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे कंपन्यांमध्ये निवड, पण परीक्षा विभागाच्या चुकीमुळे त्यांची संधी हिरावली जाण्याचा धोका निर्माण झाला होता.परीक्षा विभागाच्या अधिकाºयांकडून विद्यार्थ्यांना दिली जाणारी अपमानास्पद वागणूक ही अत्यंत गंभीर बाब आहे, याप्रकरणाची चौकशी करून संबंधितांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी राष्टÑवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राकेश कामठे व उपाध्यक्ष संतोष डोख आदी पदाधिकाºयांनी केली आहे.महाराष्टÑ नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने परीक्षा विभागाकडून होणाºया गैरप्रकारांवर बोट ठेवले आहे. परीक्षा विभाग हा सातत्याने गैरकारामुळे चर्चेत येत आहे . कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी लक्ष घालण्याची मागणी करण्यातआली आहे.
अखेर विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 06:12 IST