शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Pune Traffic : वाहतूक कोंडी सोडविण्यासाठीचा प्रकल्प पाहणीसाठी आलेले गडकरी ‘ट्रॅफिक’मध्ये अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 16:27 IST

अखेर गडकरी यांनी चालकाला माघारी गाडी वळविण्यास सांगितले. वाहतूक काेंडीमुळे प्रकल्पाची पाहणी न करताच गडकरी यांना माघारी जावे लागले.

पुणे : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शनिवारवाडा ते स्वारगेट ‘चौपदरी भुयारी मार्ग’ प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना वाहतूक कोंडीचा फटका बसला. अखेर गडकरी यांनी चालकाला माघारी गाडी वळविण्यास सांगितले. वाहतूक काेंडीमुळे प्रकल्पाची पाहणी न करताच गडकरी यांना माघारी जावे लागले.

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी प्रस्तावित शनिवारवाडा ते स्वारगेट ‘चौपदरी भुयारी मार्ग’ करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी नितीन गडकरी सकाळी साडेदहा वाजता शनिवारवाड्याजवळ येऊन पाहणी करणार होते. मात्र, गडकरी यांचे विमानतळावर विलंबाने आगमन झाले. गडकरी ११ वाजून २५ मिनिटांनी कार्यक्रमस्थळी आल्याने महापालिकेकडून शनिवारवाड्याच्या दिशेने जाणारी वाहतूक आणि छत्रपती शिवाजी महाराज पुलाकडे जाणारी वाहतूक पोलिसांनी थांबवून ठेवली होती. गडकरी यांनी कार्यक्रमस्थळी येताच भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन केले.

आमदार हेमंत रासने यांच्याकडून या प्रकल्पाची माहिती घेतली. त्यानंतर प्रकल्प पाहणीसाठी वाहनात बसून स्वारगेटच्या दिशेने जाण्यासाठी नितीन गडकरी निघाले. यावेळी आमदार हेमंत रासनेदेखील त्यांच्या वाहनात बसून मार्ग दाखविण्यासाठी निघाले. मात्र, सकाळची वेळ असल्याने दोन्ही वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या. त्यातच वाहनचालकांनी जोरजोरात ‘हाॅर्न’ वाजविण्यास सुरुवात केल्याने पोलिसांनी पुढील मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असल्याचे गडकरींना सांगितले. अखेर गडकरी यांनी चालकाला माघारी गाडी वळविण्यास सांगितले अन् रासने गाडीतून खाली उतरले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रNitin Gadkariनितीन गडकरीTrafficवाहतूक कोंडी