शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

बसपेक्षा परवडते दुचाकी, वाहतूककोंडी, ब्रेकडाऊनमुळे मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 02:35 IST

बसचा तिकीट दर अन् तेवढ्याच अंतरासाठी दुचाकीला लागणारे पेट्रोल, वाहतूककोंडीत अडकणाऱ्या बस, ब्रेकडाऊन तसेच बसेसच्या अनियमिततेमुळे कोलमडणारे वेळेचे गणित अशा विविध कारणांमुळे बसपेक्षा स्वत:ची दुचाकीच परवडत असल्याची भावना सर्वसामान्य पुणेकरांची होऊ लागली आहे.

- राजानंद मोरेपुणे - बसचा तिकीट दर अन् तेवढ्याच अंतरासाठी दुचाकीला लागणारे पेट्रोल, वाहतूककोंडीत अडकणाऱ्या बस, ब्रेकडाऊनतसेच बसेसच्या अनियमिततेमुळे कोलमडणारे वेळेचे गणित अशा विविध कारणांमुळे बसपेक्षा स्वत:ची दुचाकीच परवडत असल्याची भावना सर्वसामान्य पुणेकरांची होऊ लागली आहे. पण दुचाकींचे प्रमाण वाढणे शहराला परवडणारे नाही. त्यासाठी पीएमपीचे बस व पासचे तिकीट दर कमी करून अधिकाधिक प्रवासी आकर्षित करणे आवश्यक आहे.पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रासह परिसरातील विविध भागांमध्ये ‘पीएमपी’कडून बससेवा पुरविली जाते सार्वजनिक वाहतुक व्यवस्था असलेल्या ‘पीएमपी’ने दररोज सरासरी ९ ते १० लाख प्रवासी प्रवास करतात. पण मागील काही वर्षांपासून ‘पीएमपी’ खिळखिळी झाल्याने अनेक प्रवासी या सेवेपासून दुर गेले. त्यांनी स्वत:च्या दुचाकीचा पर्याय निवडला आहे. पीएमपीचा तिकीट दर, ब्रेकडाऊनचे प्रमाण, बसेसची अनियमितता व त्यामुळे फुकट जाणारा वेळ या बाबींचा विचार केल्यास अनेकांना दुचाकी सोयीची वाटते.पीएमपीचे सध्याचे तिकीट दर आणि तेवढ्याच अंतरासाठी दुचाकीसाठी येणारा खर्च यामध्ये फारसे अंतर नाही. पीएमपीचा १६ किलोमीटर अंतरावरील प्रवासासाठी २५ रुपये तिकीट दर आहे. तर सध्याच्या पेट्रोलच्या दराचा विचार केल्यास जवळपास तेवढ्याच अंतरासाठी दुचाकीला जवळपास तितकाच खर्च येतो. दुचाकीने तेवढ्याच कर्चात दोघे जण जाऊ शकतात. किलोमीटर वाढत गेल्यानंतर तिकीट दर काही प्रमाणात कमी होत जातो. सध्या ३६ किलोमीटर प्रवासासाठी ४० रुपये, ४८ किलोमीटर प्रवासासाठी ५० रुपये तर ६० किलोमीटर प्रवासासाठी ६० रुपये तिकीट दर आहे. यावरून असे दिसते की जवळच्या अंतरासाठीचे तिकीट दर लांब पल्यापेक्षा कमी आहेत. हेच दर जवळपास दुचाकीच्या पेट्रोल खर्चाएवढेच आहेत. त्यात पुन्हा घर ते बसथांबा हे अंतर तसेच इच्छित ठिकाण आणि बसथांब्याचे अंतर या मुद्दाही महत्वाचा आहे. बस प्रवासासाठी लागणारा वेळ आणि दुचाकीवरील लागणारा वेळ यात खुप तफावत असते. या सर्व बाबी सामान्य पुणेकरांच्या दृष्टीने दुचाकी वापरण्यासाठी कारणीभुत ठरतात. त्यामुळे कमी अंतरावरील प्रवासासाठी खर्च आणि वेळेचा ताळमेळ दुचाकीला पुरक असल्याचे दिसते.सुसूत्रीकरणामुळे तिकीट दरामध्ये बदल1 डिसेंबर २०१४ मध्ये झालेल्या सुसूत्रीकरणामुळे तिकीट दरामध्ये बदल झाले. तेव्हा आजपर्यंत पाचच्या पटीत तिकीट दर आहेत. त्यापूर्वी प्रत्येक टप्प्यानुसार १ ते ९ च्या पटीत होते. त्यामुळे सुट्टया पैशांची अडचण होत होती. हे टाळण्यासाठी तिकीट दर पाचच्या पटीत केल्याने काही टप्प्यांच्या दरात २ ते ३ रुपयांची वाढ तर काही टप्प्यांच्या दरात तेवढीच घट झाली.2प्रामुख्याने कमी अंतराचे दर वाढल्याची नाराजी प्रवाशांकडून व्यक्त करण्यात आली होती. यापूर्वी २०१२ मध्ये तिकीट दर वाढले होते. त्यानंतर आजपर्यंत दरवाढ झालेली नाही.3या तुलनेत डिझेलचे दर सातत्याने वाढत गेले आहेत. असे असले तरी पीएमपीकडून सध्या दरवाढीचा कोणताही प्रस्ताव नाही.वाढत जाणारी खासगी वाहने शहराच्यादृष्टीने परवडणारे नाही. शहरातील वाहतुकीची समस्या सुटण्यासाठी ‘पीएमपी’ सक्षम करणे आवश्यक आहे. अधिकाधिक प्रवासी बसकडे आकर्षित व्हायला हवे. त्यासाठी तिकीट व पासचे दर कमी करायला हवेत. शहरात जवळच्या अंतरासाठी केवळ पाच रुपये तिकीट, पासचे दर अत्यंत कमी करणे, त्यासाठी आकर्षण योजना करता येतील. पीएमपीच्या सध्याच्या स्थितीमुळेदुचाकी वापरावी असे अनेकांना वाटते. हे चित्र बदलायला हवे.- संजय शितोळे, पीएमपी प्रवासी मंच

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडीnewsबातम्या