शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
2
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
3
बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली
4
“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला
5
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
6
किम जोंग उनला लादेनप्रमाणेच मारण्याची तयारी, सैनिकही पाठवले, पण एक चूक झाली आणि फसला अमेरिकेचा प्लॅन 
7
Mumbai: विद्यार्थी एक दिवस शिक्षकांच्या भूमिकेत; वर्गांवर घेतला तास!
8
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
9
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
10
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
11
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
12
Viral Video : ट्रेनचा 'हँडसम' टीटीई बनला सोशल मीडिया सेन्सेशन! प्रवास करणाऱ्या तरुणीची नजर हटेना
13
Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद
14
VIDEO: उब्जेकिस्तानची Robiya Havasguruhi भारतात तुफान VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण...
15
अमेरिकन मंत्री संतापला, भारताला म्हणाला, माफी मागा...; PM नरेंद्र मोदींसमोर ठेवल्या ४ अटी
16
"स्वस्ताईचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही तर खैर नाही..."
17
BEST: आणखी एका बसचा ‘कोस्टल’वर गारेगार प्रवास!
18
Metro: ‘मेट्रो-६’ डेपोच्या जागेचा तिढा सुटेना!
19
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
20
राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’

पुणेकरांनो सावध व्हा...! AI थेट पावती फाडणार; मागचा पुढचा विचार सोडा... वाहतूक नियम पाळा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 14:11 IST

Pune Traffic Challan AI Camera: पुणे शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आता AI मार्फत नजर ठेवली जाणार आहे. यासाठी सध्या प्रायोगिक तत्वावर एफसी रोडवर वैशाली हॉटेल समोर एआय कॅमेरा बसविण्यात आला आहे.

पुणे शहरात वाहतुकीचे नियम सऱ्हास मोडले जातात. सीसीटीव्ही कॅमेरे असलेल्या चौकांतही, वर्दळीच्या चौकांतच नाही तर अगदी वाहतूक पोलिसांच्या समोरून सिग्नल मोडून हे वाहनचालक वाहन दामटवतात. यात सिग्नल पाळणाऱ्यांची पंचाईत होते, नाहक अपघाताला सामोरे जावे लागते किंवा शिवीगाळही सहन करावी लागते. हे अनुभव बऱ्याचदा येतात. यामुळे या अशा मुजोर वाहनचालकांवर लक्ष ठेवण्यासाठी पुणे पोलीस एआय कॅमेरांद्वारे थेट दंडाच्या पावत्या फाडणार आहेत. 

पुणे शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आता AI मार्फत नजर ठेवली जाणार आहे. यासाठी सध्या प्रायोगिक तत्वावर एफसी रोडवर वैशाली हॉटेल समोर एआय कॅमेरा बसविण्यात आला आहे. शहरात वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई अधिक अचूक आणि कार्यक्षमपणे करणे, हा या मागचा हेतू आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने वाहतूक कॅमेऱ्यांद्वारे नियमभंग ओळखणे, त्याची नोंद ठेवणे आणि थेट दंड आकारणे अशा प्रकारचे काम याद्वारे केले जाणार आहे. 

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार याचे उद्घाटन होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करणे सोपे होणार असले तरी यामध्ये त्रास नियम पाळणाऱ्या वाहन चालकांनाही होणार आहे. 

वाहतुकीचे नियम पाळणे पाप की काय...

पुण्यात अनेकदा पाठीमागून येणारे हुल्लडबाजी करणारे वाहनचालक इतरांना वाहतुकीचे नियम पाळण्यापासून परावृत्त करतात. असे अनेक प्रकार खासकरून सिग्नलवर घडत असतात. एखाद्याने सिग्नल पाळला तर त्याला शिवीगाळ केली जाते, अश्लील हातवारे केले जातात. दमबाजी केली जाते. मोठमोठ्याने हॉर्न वाजवून त्याला त्रासही दिला जातो. यामुळे तो नियम पाळणारा वाहनचालक जिवाच्या भीतीने बाजुला होतो किंवा सिग्नलवर पहिल्याच रांगेत असेल तर झेब्रा क्रॉसिंगवर गाडी नेतो आणि त्या वाहनचालकाला वाट मोकळी करून देतो. असे झाले तर एआय कॅमेरा मागचा पुढचा विचार न करता या गुंडगिरीला बळी पडलेल्या वाहनचालकालाही दंड करणार आहे. हे प्रकार सर्रास सिग्नलवर घडत आहेत. यामुळे पुण्यात वाहतुकीचे नियम पाळणे म्हणजे पाप की काय असे वाहनचालकांना वाटू लागले आहे. यामुळे आता एआय कॅमेरा आला की मागच्याचा पुढच्याचा विचार न करता नियम पाळणाऱ्या वाहनचालकांना काहीही करून नियम पाळावाच लागणार आहे. 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसPuneपुणेTrafficवाहतूक कोंडी