शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

देशात पुणे अव्वल स्थानावर; शहरात १५ ऑगस्टपर्यंत तब्बल '३० लाख' जणांची कोरोना चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 11:29 IST

लोकसंख्येच्या एकूण ९४ टक्के नागरिकांचे झाली तपासणी

ठळक मुद्देशहरात कोरोनाबाधितांपैकी ९८ टक्के रूग्ण कोरोनामुक्त

निलेश राऊत

पुणे : शहरात ९ मार्च, २०२० रोजी कोरोनाचा पहिला रूग्ण आढळून आल्यानंतर, प्रत्येक कोरोना संशयिताची तपासणी करण्याची मोहिम प्रभावीपणे राबविण्यात आली़ परिणामी रविवार १५ ऑगस्टपर्यंत शहरात लोकसंख्येच्या (सन २०११ च्या जनगणनेनुसार) ९४ टक्के नागरिकांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. तर गत दहा वर्षातील शहरातील वाढलेली लोकसंख्या लक्षात घेऊन, पुणे महापालिका हद्दीत साधारणत: आजच्या लोकसंख्येच्या सुमारे ९० टक्के नागरिकांची म्हणजेच, तब्बल ३० लाख ४ हजार ७३९ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.      कोरोनाचा पहिला रूग्ण आढळल्यानंतर, प्रारंभी महापालिकेच्या विविध तपासणी केंद्रांवर संशयित कोरोना संशयितांची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्यात येत होती. या चाचणीचा ‘एनआयव्ही’ या राष्ट्रीय प्रयोगशाळेकडून अहवाल येण्यास साधारणत: ४८ तास म्हणजेच दोन दिवस लागत असे. परंतु, कोरोना संसर्गाचे जसे प्रमाण वाढत गेले. तसे तपासणीची आणखी सहज सुविधा उपलब्ध झाली व जून, २०२० अखेर ‘आरटीपीसीआर’सह ‘अ‍ॅण्टीजेन’ ही अवघ्या काही मिनिटात चाचणीचा अहवाल देणारी कोरोना चाचणी शहरात सुरू झाली. तर यानंतर काही दिवसांतच काळात खाजगी प्रयोगशाळांनाही कोरोना चाचणीची परवागनी मिळाली.      शहरात पहिल्यापासूनच संशयितांची कोरोना चाचणी करून कोरोनाबाधितांना इतरांपासून लागलीच विलग करणे, यामुळे आज पुणे शहराने पहिल्या व दुसऱ्या लाटेवर इतर शहरांच्या तुलनेत यशस्वी मात केली आहे. १५ ऑगस्टपर्यंत शहरातील कोरोना चाचणीचा हा आकडा ३० लाखाच्यापुढे गेला आहे.  रविवारी सायंकाळपर्यंत शहरात ३० लाख ४ हजार ७३९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १६ टक्के कोरोनाबाधित आढळून आले आहेत. शहरातील कोरोनाबाधितांची ही एकूण संख्या ४ लाख ९०  हजार  ४४६ जण इतकी आहे. 

शहरात कोरोनाबाधितांपैकी ९८ टक्के रूग्ण कोरोनामुक्त  दरम्यान एकूण कोरोनाबाधितांपैकी ९८ टक्के रूग्ण कोरोनामुक्त झाले असून, ही संख्या ४ लाख ७९ हजार ५०१ इतकी आहे.  तर आजपर्यंत शहरात पुणे महापालिका हद्दीतील आजपर्यंत ८ हजार ८४७ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधितांपैकी २ टक्के रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या या कोरोनाबाधित रूग्णांपैकी बहुतांशी रूग्ण हे अन्य आजाराने ग्रासलेले होते तर बहुतांशी जण हे वयाची ६० पार केलेले होते.      शहरात १५ ऑगस्ट पर्यंतची स्थिती 

एकूण कोरोना चाचण्या :- ३० लाख ४ हजार ७३९ एकूण कोरोनाबाधित :- ४ लाख ९० हजार ४४६ एकूण कोरोनामुक्त :- ४ लाख ७९ हजार ५०१ कोरोनामुळे मृत्यू :- ८ हजार ८४७ 

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतdocterडॉक्टरhospitalहॉस्पिटल