शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

पुणे-बारामती आणि बारामती ते दौंड रेल्वे सेवा गुरुवारपासून अंशत: सुरु होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 17:50 IST

गुरूवारपासून पुणे ते बारामती व बारामती ते दौंड अशा दोन फेऱ्या केल्या जाणार आहेत....

बारामती: कोविड संसर्गाच्या पार्श्वभुमीवर जवळपास दोन वर्षांपासून बंद असलेली रेल्वेसेवा पुन्हा अंशत: सुरु करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. बारामतीकरांच्या आवडीची तसेच सोयीची असणारी प्रवाशीसेवा मात्र सध्या गैरसोयीचीच ठरणार आहे. थेट बारामती-पुणे रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

रेल्वेच्या जाहीर केलेल्या प्रसिध्दीपत्रकानुसार गुरुवारपासून ( दि २७ ) पुणे ते बारामती व बारामती ते दौंड अशा दोन फे-या केल्या जाणार आहेत. बारामती पुणे अशी रेल्वे सेवा सुरु करण्याची बारामतीकरांची मागणी होती. विशेषत: एसटी संपाच्या सणासुदीच्या काळापासून या मागणीने जोर धरला आहे. ‘मनसे’च्या वतीने अ‍ॅड. भार्गव पाटसकर यांनी देखील याबाबत निवेदन देत बारामती-पुणे रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. त्याची काही प्रमाणात दखल घेण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात ही मागणी पूर्णच झालेली नसून सध्या तरी अंशत: रेल्वे सेवा सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

गुरुवारपासून सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकावरुन दहा डब्यांची डेमू रेल्वे सुटेल. ती पावणेनऊ वाजता दौंड रेल्वे स्थानकावर येईल. पाच मिनिटांचा थांबा घेऊन ती मळदगाव, शिरसाई, कटफळ मार्गे बारामतीत सव्वा दहा वाजता दाखल होईल. हीच गाडी तीन तासांचा थांबा बारामतीत घेऊन पुन्हा दुपारी सव्वा एक वाजता दौंडकडे रवाना होईल. दौंडला ही गाडी दुपारी दोन वाजून ३५ मिनिटांनी पोहोचणार आहे.

बारामतीहून थेट पुण्याला जाण्यासाठी रेल्वेसेवा सुरु होण्यास आणखी किती दिवसांचा कालावधी लागेल, हा प्रश्न सध्या तरी निरुत्तरीतच आहे. रेल्वेने प्रवास करायचा असल्यास तिकीट काढताना लसीचे दोन्ही डोस घेतल्याचा युनिर्व्हसल पास दाखवावा लागणार आहे, १८ वर्षांखालील मुलांना वयाचा दाखला दाखवावा लागणार आहे. दरम्यान रेल्वेने ही सेवा सुरु करण्यासाठी पूर्ण तयारी केल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडrailwayरेल्वेBaramatiबारामतीdaund-acदौंड