शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Pune: चाकण परिसरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 12:14 IST

पुणे-नाशिक महामार्गावर सुर्या हॉस्पिटलसमोर रस्ता ओलांडत असताना भरधाव ट्रकच्या धडकेत पादचारी इसमाचा मृत्यू झाला...

चाकण: पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यातील दोन अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटल्याने त्यांचा अपघात होऊन मृत्यू झाला आहे. तर तिस-या अपघातात ट्रकच्या धडकेत पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे चाकण पोलिसांनी सांगितले. 

पुणे-नाशिक महामार्गावर सुर्या हॉस्पिटलसमोर रस्ता ओलांडत असताना भरधाव ट्रकच्या धडकेत पादचारी इसमाचा मृत्यू झाला आहे.  नारायण सीताराम कांबळे (वय.४५ वर्षे, रा. कडाचीवाडी, ता. खेड) असे ट्रकच्या धडकेत मृत्यू झालेल्या पादचारी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा भाऊ सतीश सीताराम कांबळे (वय.५० वर्षे ) यांनी चाकण पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालक गोविंद गंगाधर चाटे (वय.२७ वर्षे, रा. चाकण) याला पोलिसांनी अटक केली आहे. पादचारी नारायण कांबळे हे सोमवारी दुपारी साडेबारा वाजता पुणे-नाशिक महामार्गावर सुर्या हॉस्पिटल समोर रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव ट्रकने कांबळे यांना धडक दिली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे.

दुसऱ्या घटनेत दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रोहकल वाकी रस्त्यावर तरुण ठार झाला आहे. या अपघातात आशिष मारुती मचेकर (वय.२२ वर्षे, रा. देहूगाव) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. आशिष याने त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगात चालवून तिच्यावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या अपघातात आशिषचा मृत्यू झाला. ही घटना चाकण गावच्या हद्दीत रोहकल ते वाकी रोडवर घडली असल्याचे चाकण पोलिसांनी सांगितले.

तिस-या घटनेत प्रतीक महाबल शिरढोणे (वय.२३ वर्षे, सध्या रा. देहूगाव, मूळ रा. सोलापूर) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. रात्रीच्या वेळी प्रतीक त्याच्या दुचाकीवरून येलवाडी वरून देहूगावकडे जात होता. येलवाडी गावच्या हद्दीत रस्त्यावरील खड्ड्यात त्याची दुचाकी आदळली. यात त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो रस्त्यावर पडला. यात गंभीर जखमी झाल्याने प्रतीकचा मृत्यू झाला. याबाबतचा अधिक तपास महाळुंगे पोलीस करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडChakanचाकण