शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

पुण्यात तब्बल २७ लाख दुचाकींची नोंद, वर्षभरात पावणेतीन लाखांनी भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 03:36 IST

पेन्शनरांचे शहर, शिक्षणाचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी अशी पुण्याची असलेली ओळख आता ‘दुचाकीकरांचे शहर’ अशीच करून द्यावी लागेल.

पुणे - पेन्शनरांचे शहर, शिक्षणाचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी अशी पुण्याची असलेली ओळख आता ‘दुचाकीकरांचे शहर’ अशीच करून द्यावी लागेल. कारण शहरातील नोंदणीकृत वाहनांची संख्या ३६ लाख २७ हजार २८०वर पोहोचली असून, त्यात दुचाकींची संख्या तब्बल २७ लाख ३ हजार १४७ इतकी आहे. विशेष म्हणजे मागील वर्षभरात एकूण वाहनसंख्येत २ लाख ८९ हजार ९१० वाहनांची भर पडली आहे.प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी बुधवारी ही आकडेवारी जाहीर केली. गेल्या वर्षभरात (एप्रिल २०१७ ते मार्च २०१८) दुचाकींच्या संख्येत २ लाख ५ हजार ८०४ ने वाढ झाली आहे. चारचाकी वाहनांची संख्या ६ लाख ४५ हजार ६८३ वर पोहोचली असून, त्यात ५६ हजार ४१० वाहनांची भर पडली.टॅक्सी कॅब, रिक्षा, ट्रक, लॉरी आणि डिलिव्हरी व्हॅनच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. स्कूल बस, रुग्णवाहिका, खासगी बस, ट्रक, टँकर, ट्रॅक्टर, ट्रेलर, मालवाहू वाहनांची विक्री गेल्यावर्षी इतकीच झाली आहे. रिक्षांचा परवाने खुले केल्याने या वर्षी ८ हजार २२३ नवीन रिक्षा रस्त्यावर आल्या आहेत. आता शहरातील रिक्षांची संख्या ५३ हजार २२७ इतकी झाली आहे.टॅक्सी कॅबच्या संख्येत ५ हजार ६४८ ने वाढ झाली असून, त्यांची संख्या २८ हजार ३४४ झाली आहे. चारचाकी डिलिव्हरी व्हॅनची संख्या ४ हजार ३५३ ने वाढून ४७ हजार १३५ आणि तीनचाकी डिलिव्हरी व्हॅनची संख्या १ हजार ५२२ ने वाढून ३३ हजार ८९५ झाली आहे.ट्रक-लॉरीची संख्या ३ हजार ८९० ने वाढून ३८ हजार ५९८ वर पोहोचली आहे. स्कूल बसच्या संख्येत २८३ ने वाढ झाली असून, ती २ हजार ५६४ झाली.पुणे शहराची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार ३१ लाख १५ हजार इतकी आहे. गेल्या ७ वर्षांत लोकसंख्येत ४ लाखांची वाढ गृहित धरली, तरी शहरातील वाहनांची संख्या दरडोईपेक्षा अधिक असल्याचे दिसून येत असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.वाहन नोंदणीचे वार्षिक उड्डाणवाहन प्रकार २०१३-१४ २०१४-१५ २०१५-१६ २०१६-१७ २०१७-१८दुचाकी १,४५,७९४ १,६६,१९९ १,७८,१५७ १,७९,६७३ २,०५,८०४चारचाकी ४१,५०७ ४५,९४४ ४६,६०९ ४९,७५५ ५६,४१०एकूण वाहने १,९७,०२८ २,३३,५९६ २,४९,४७८ २,७०,३०७ २,८९,९१०

टॅग्स :PuneपुणेRto officeआरटीओ ऑफीस