शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Pune: दोघांचा जीव घेणाऱ्या 'त्या' धनाढ्याच्या मुलाला अपघात विषयावर निबंध लिहावा लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 22:08 IST

Pune Accident News: दोघांचा जीव घेणाऱ्या त्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाला आज बाल न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला आहे. सोबतच न्यायालयाने या मुलाला १५ दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करण्यास सांगितले. याशिवाय अपघात या विषयावर निबंध लिहीण्याची अट घातली आहे. तो आता येरवडा वाहतूक विभागासोबत याठिकाणी वाहतूक नियम करणार आहे.

- किरण शिंदे शनिवारी मध्यरात्री पुण्यातील कल्याणी नगर परिसरात एक भीषण अपघात झाला. या अपघातात आयटी इंजिनियर असलेल्या अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा (वय २४, रा. पुणे, मुळ. मध्यप्रदेश) या दोघांचा मृत्यू झाला. या दोघांच्या दुचाकीला पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा चालवत असलेल्या आलिशान पोर्शे कारणे धडक दिली होती. दरम्यान दोघांचा जीव घेणाऱ्या त्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाला आज बाल न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला आहे. सोबतच न्यायालयाने या मुलाला १५ दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करण्यास सांगितले. याशिवाय अपघात या विषयावर निबंध लिहीण्याची अट घातली आहे. तो आता येरवडा वाहतूक विभागासोबत याठिकाणी वाहतूक नियम करणार आहे.

दरम्यान, अल्पवयीन असलेला हा मुलगा शनिवारी रात्री पोर्शे ही महागडी कार घेऊन मित्रांसोबत बाहेर पडला होता. तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचेही प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सांगितले. ताशी 200 किमी वेगाने असलेली त्याची कार अनिस आणि अश्विनी असलेल्या दुचाकीला धडकली. यामध्ये दुचाकी वर पाठीमागे बसलेली अश्विनी हवेत फेकली गेली. नंतर जमिनीवर आदळल्याने तिचा मृत्यू झाला. तर अनिश याला देखील जबर मार लागल्याने त्याचाही मृत्यू झाला. अपघातानंतर अल्पवयीन कारचालक पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना नागरिकांनी त्याला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले. 

दरम्यान, या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भादवी कलम ३०४ (अ) नुसार कलम लावले. तर, मोटार वाहन कायद्यानेही गुन्हा नोंद केला. येरवडा पोलिसांनी त्याला आज सुट्टीच्या बाल न्यायालयात हजर केले. तसेच, त्याची पोलीस कोठडी देखील मागितली. परंतु, न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. न्यायालयाने त्याला काही अटी व शर्तीवर जामीन दिल्याचे मुलाचे वकिल ऍड. प्रशांत पाटील यांनी सांगितले. या मुलाने पंधरा दिवस येरवडा वाहतूक विभागाअंतर्गत पोलिसांसोबत काम करावे. तसेच, अपघात या विषयावर निबंध लिहावा असे न्यायालयाने जामीन देताना म्हंटले आहे. तर, मुलाने दारू सोडण्यासाठी चांगल्या डॉक्टरांकडून उपचार व समूपोदेशन घ्यावे, असेही म्हंटले आहे. या सर्व बाबीनंतर पोलिसांनी त्याचा अहवाल न्यायालयात सादर करायचा आहे.

पालकावर गुन्हा दाखल अपघाताच्या प्रकरणात कार चालविणाऱ्या मुलावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असून, तो अल्पवयीन असूनही त्यास पबमध्ये दारू विक्री करणाऱ्या पब चालकावर आणि मुलाला गाडी देणाऱ्या पालकांवर बालन्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायद्याच्या कलम ७५ आणि ७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे