शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पुणे पुन्हा चाळिशीपार जाण्याची शक्यता ; विदर्भात आणखी चार दिवस उष्णतेची लाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 12:53 IST

देशात सध्या ओडिशा, बिहार, विदर्भ आणि तेलंगणा येथे उष्णतेची लाट आली आहे़

ठळक मुद्देमध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ पुढील चार दिवस गोव्यासह राज्यातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता राज्यात सर्वाधिक कमाल तापमान ब्रम्हपुरी येथे ४५.६ अंश सेल्सिअस

पुणे : पुणे शहरातील कमाल तापमानात आता पुन्हा वाढ होऊ लागली आहे़. शनिवारी शहरातील कमाल तापमान ३८.९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते़. त्यात रविवारी आणखी वाढ होऊन ते ३९.९ अंश सेल्सिअसची नोंद झाली़ पुढील दोन दिवस कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे़. तसेच विदर्भात उष्णतेची लाट आली असून ती आणखी चार दिवस कायम राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान ब्रम्हपुरी येथे ४५.६ अंश सेल्सिअस तर, सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १९ अंश सेल्सियस नोंदविले गेले आहे़. देशात सध्या ओडिशा, बिहार, विदर्भ आणि तेलंगणा येथे उष्णतेची लाट आली आहे़.

पुण्याच्या किमान तापमानातही वाढ होण्याची शक्यता आहे़. रविवारी किमान तापमान सरासरीएवढे २२़ ३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते़. ते पुढील दोन - तीन दिवसात २३ ते २४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़. मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे़. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किंचित घट झाली आहे़. पुढील चार दिवस गोव्यासह राज्यातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़. विदर्भात १३ ते १६ मे दरम्यान तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. ़़़़१३ ते १६ मे दरम्यान वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट असेल़ १४ ते १६ मे दरम्यान अकोला, अमरावती, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट असणार आहे़.  

टॅग्स :PuneपुणेweatherहवामानSummer Specialसमर स्पेशलTemperatureतापमान