Pune: चार वर्षाच्या मुलाच्या फ्रॅक्चर झालेल्या लिंगावर यशस्वी शस्त्रक्रिया

By ज्ञानेश्वर भोंडे | Published: August 25, 2023 05:42 PM2023-08-25T17:42:08+5:302023-08-25T17:43:04+5:30

फ्रॅक्चर झालेल्या लिंगावर वानवडी येथील एका खासगी रुग्णालयात यशस्वी उपचार..

Pune: Successful surgery on four-year-old boy's fractured penis | Pune: चार वर्षाच्या मुलाच्या फ्रॅक्चर झालेल्या लिंगावर यशस्वी शस्त्रक्रिया

Pune: चार वर्षाच्या मुलाच्या फ्रॅक्चर झालेल्या लिंगावर यशस्वी शस्त्रक्रिया

googlenewsNext

पुणे : वरून पडल्यामुळे चार वर्षाच्या मुलाच्या फ्रॅक्चर झालेल्या लिंगावर वानवडी येथील एका खासगी रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले. या हाॅस्पिटलच्या बालरोग मूत्रविज्ञान विभागातील डाॅक्टरांनी शस्त्रक्रिया केली.

हा मुलगा उंचावरून ड्रॉवरच्या काठावर पडल्याने त्याच्या लिंगाला दुखापत झाली. त्यामुळे पालकांनी त्याला वानवडीच्या खासगी आपत्कालीन विभागात आणले. एमआरआय पेल्विस तपासणीत लिंगाचे फ्रॅक्चर झाल्याचे आढळले. तसे पाहता पुरुषाचे जननेंद्रिय फ्रॅक्चर होणे अत्यंत दुर्मिळ आहे. विशेषतः अशा लहान वयाच्या मुलांमध्ये ते दुर्मिळ आहे. या परिस्थितीची गरज ओळखून यूरोलॉजिस्ट डॉ. क्षितिज रघुवंशी व त्यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने रुग्णाला तातडीने ऑपरेशन थिएटरमध्ये हलवले.

यूरोलॉजिस्ट डॉ. क्षितीज रघुवंशी यांनी पेनाईल फ्रॅक्चर शस्त्रक्रिया कौशल्याने केली. १९ ऑगस्ट रोजी झालेल्या शस्त्रक्रियेमध्ये जखमी लिंगाची गुठळी काढून त्यावर टाके घातले. तर २१ ऑगस्ट रोजी त्याला घरी सोडण्यात आले.

Web Title: Pune: Successful surgery on four-year-old boy's fractured penis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.