शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

पुणे एसटी महामंडळाचा दररोज बुडतोय ९५ लाखांचा महसुल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 1:28 PM

दररोज सहन करावा लागत आहे १५ ते २० लाख रुपयांचा तोटा..

ठळक मुद्देअधिक प्रवासी असलेल्या मार्गांवर लक्ष केंद्रीत करून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न

पुणे : एसटी महामंडळाने प्रवाशांना पुर्ण क्षमतेने प्रवास करण्यास हिरवा कंदील दाखविला असला तरी अजूनही अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. अनेक एसटी बस रिकाम्याच धावत असल्याने दररोज सुमारे ९५ लाख रुपयांचा महसुल बुडत आहे. तसेच सध्या धावणाऱ्या बसचा खर्च आणि प्रत्यक्ष उत्पन्न यामध्ये मोठी तफावत असल्याने दररोज १५ ते २० लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.एसटी महामंडळाची आंतरजिल्हा बससेवा २० ऑगस्टपासून सुरू झाली. त्यापैकी जिल्हांतर्गत बस धावत होत्या. आंतरजिल्हा बस सुरू झाल्यानंतर प्रवाशांमध्ये वाढ होत गेली. एका बसमध्ये ५० टक्के प्रवासी घेणे बंधनकारक असल्याने एसटीला मोठा तोटा होत होता. हा तोटा कमी करण्यासाठी मागील आठवड्यात पुर्ण क्षमतेने प्रवासी नेण्याचा निर्णय झाला. पण त्यानंतरही फारसा फरक पडल्याचे दिसत नाही. एसटीच्या पुणे विभागात म्हणजे पुणे जिल्ह्यातील विविध विभागांतून दररोज सुमारे २७५ बस मार्गावर येत आहेत. त्याद्वारे सुमारे ९० हजार किलोमीटरचा प्रवास होत असून सुमारे १८ हजार प्रवासी मिळत आहेत. या प्रवासातून सुमारे १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. लॉकडाऊनपुर्वी फेब्रुवारी महिन्यात दररोज सुमारे ८०० बस मार्गावर होत्या. तर सुमारे १ कोटी रुपये उत्पन्न होते. म्हणजे प्रति किलोमीटर ३५ रुपये उत्पन्न मिळत होते. दररोज सुमारे एक लाख प्रवासी बसचा वापर केला.

लॉकडाऊनपुर्वी व आताची स्थिती पाहता एसटीच्या पुणे विभागाचा सध्या दररोज सुमारे ९५ लाख रुपयांचा महसुल बुडत आहे. तसेच प्रति किलोमीटर सुमारे ४० ते ४३ रुपये खर्च व मिळणारे उत्पन्नाची तुलना केल्यास दररोज सुमारे १८ ते २० लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. इंधनखर्च भागविणे कठीण जात असल्याने एसटीकडून प्रवासी वाढविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. रिकाम्या धावणाऱ्या गाड्यांवर नियंत्रण आणले जात आहेत. अधिक प्रवासी असलेल्या मार्गांवर लक्ष केंद्रीत करून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे अधिकाºयांनी सांगितले.----------------पुणे विभागाची दैनंदिन स्थिती -लॉकडाऊनपुर्वी                  सध्यामार्गावर बस ८००               २७५धाव (किमी) ३,१८,१३७      ९०, १३८उत्पन्न १,१०,८२,०००        १५,१७,०००प्रवासी (सुमारे) १,००,०००  १८,०००--------------------------------------------------

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याST Strikeएसटी संपpassengerप्रवासी