शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-सोलापूर महामार्ग : टोलवसुली पट्ट्यात दिशादर्शकांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 02:33 IST

पुणे-सोलापूर महामार्गाच्या टोलवसुली पट्ट्यात सुविधांबाबत कमालीची दुरवस्था असतानाही टोलवसुली कंपनीचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे.

उरुळी कांचन - पुणे-सोलापूर महामार्गाच्या टोलवसुली पट्ट्यात सुविधांबाबत कमालीची दुरवस्था असतानाही टोलवसुली कंपनीचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे.रस्ता दुभाजक उंची कमी झाली आहे, झेब्रा क्रॉसिंग पट्टे नाहीत, दिशादर्शक फलक सुस्थितीत नाहीत, अंतराचे फलक काही ठिकाणी नाहीत तर काही ठिकाणी दुरवस्था झाली आहे, गावांच्या नावांचे फलक योग्य त्या मोठ्या आकाराचे व नेमक्या ठिकाणी नाहीत, सर्व्हिस रस्ते वाहतुकीसाठी नाहीतच त्यावर सगळीकडे अतिक्रमण झाले आहे. ते दूर करून उपयोगात आणणे, मुख्य रस्ता व सर्व्हिस रस्ता यामध्ये असणाऱ्या अनेक ठिकाणच्या लोखंडी जाळ्या तुटल्यात किंवा चोरून नेल्या आहेत.त्या परत बसविणे यांसारख्या जबाबदाºया टाळणे, धोक्याच्या किंवा अपघातप्रवण क्षेत्रात काही अतिरिक्त सूचनाफलक किंवा हायमास्ट दिवे लावणे, तसेच वेगनियंत्रण करण्यासाठी लालरंगाच्या दिव्यांची व्यवस्था, अशा व अनेक सोयीसुविधा पुरवणे हे या कंपनीने करणे निविदा-शर्तींनुुसार अपेक्षित असताना याकडे या कंपनीने तब्बल१४ वर्षे झाली पूर्णपणे डोळेझाक केलेली आहे.फक्त टोलवसुली हेच आपले काम, अशा पद्धतीने त्यांचे काम जोरात सुरू आहे. कंपनीच्या टोलवसुलीची मुदत फक्त दोन वर्षे बाकी असताना ते आता काय लक्ष घालणार, असा सवाल उपस्थित झाला आहे. काही ठिकाणी साईटपट्ट्या ९ इंच ते फुटभर पडलेल्या तर काही ठिकाणी साईटपट्ट्या फुटभर उंच झाल्या आहेत.अपघातप्रवण क्षेत्र वाहने सावकाश चालवा, असा फलक व धोक्याची सूचना देणारा लाल सिग्नल बसविणे गरजेचे आहे. कोणताही अधिकारी याबाबत कर्तव्य तत्परता दाखवीत नाही, हीच मोठी शोकांतिका आहे. संबंधितानी त्वरित लक्ष घालून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या भागातील नागरिकांनी व वाहनचालकांनी केली आहे.शासन व सदरची खासगी कंपनी यांच्यामधील करारानुसार टोलवसुलीपासून ते टोलवसुली संपेपर्यंतच्या कालावधीत या रस्त्याची संपूर्ण देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी कंपनीची आहे.सुविधांपासून वंचित : टोल वसुलीत धन्यताकंपनीने रस्त्याचा संपूर्ण पृष्ठभाग (डांबरीकरणाचा) समपातळीत राखणे, सेवा रस्ता सुस्थितीत ठेवणे व त्यावर अतिक्रमण होऊ न देणे, मुख्य रस्त्याच्या साईडपट्ट्या वापरायोग्य ठेवणे व त्यांची निगा राखणे, गरजेच्या ठिकाणी संरक्षक कठडे लावणे आणि त्याची निगा राखणे, झेब्रा क्रॉसिंग पट्टे मारणे, रस्ता दुभाजाकावरील प्रकाश नियंत्रक सुस्थितीत ठेवणे, महामागार्पासून प्रत्येक गावांचा जोडरस्त्याच्या ठिकाणी होणारे अपघात टाळण्यासाठी नियंत्रक दिवे बसविणे, चौकाच्या ठिकाणी असलेल्या मोठ्या प्रकाशझोताच्या दिव्यांची सोय करणे व गरजेच्यावेळी दुरुस्ती करणे, दिशादर्शक फलक, अंतराचे फलक, गावांच्या नावांचे फलक व रहदारीसाठी राष्ट्रीय महामार्ग व परिवहन खात्याच्या नियमावली आणि निर्देशानुसार लावले पाहिजेत, असे फलक लावणे व त्यांची निगा ठेवणे हे जनतेच्या सोयीसाठी त्यांना मिळणाºया पैशांतून पुरविण्याची महत्वाची जबाबदारी या कंपनीवर असतानाही सदर कंपनी आपल्या जबाबदारीचे भान न ठेवता फक्त टोलवसुली करण्यातच धन्यता मानत आहे. जनतेला अनेक सुविधांपासून वंचित ठेवत आहे.

टॅग्स :highwayमहामार्गPuneपुणेSolapurसोलापूर