शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
4
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
5
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
6
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
7
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
8
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
9
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
10
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
11
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
12
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
13
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
14
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
15
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
16
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
17
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
18
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

Pune: पहाटे गॅसचा वास; लायटर लावले अन् स्फोट, एकाच कुटुंबातील चौघे जखमी, दाम्पत्याची प्रकृती चिंताजनक

By नितीश गोवंडे | Updated: May 28, 2025 21:20 IST

स्फोटाच्या हादऱ्यात खिडकीच्या काचा फुटल्या, तसेच स्फोटानंतर लागलेल्या आगीत टेबल आणि कपडे जळाली

पुणे : स्वयंपाकाच्या सिलिंडरचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील चौघे जण जखमी झाल्याची घटना हडपसर भागातील महंमदवाडीत घडली. जखमी दाम्पत्यासह त्यांच्या मुलांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. टेकचंदसिंग चौहान (४२), बेबी टेकचंदसिंग चौहान (३८), कशिश टेकचंदसिंग चौहान (१८) आणि निखिल टेकचंदसिंग चौव्हाण (१५) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौहान कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशमधील आहे. ते आठ दिवसांपूर्वी पुण्यात आले आहे. महमंदवाडी रस्त्यावरील वाडकर मळा भागात अजय परदेशी यांची खोली भाड्याने ते राहत होते. कामाच्या शोधात चौहान कुटुंबीय पुण्यात आले होते.

चौहान कुटुंबीय गाढ झाेपेत होते. बुधवारी (दि. २८) पहाटे पाचच्या सुमारास सिलिंडरमधून गळती सुरू झाली आणि स्फोट झाला. स्फोटाच्या हादऱ्यात खिडकीच्या काचा फुटल्या, तसेच स्फोटानंतर लागलेल्या आगीत टेबल आणि कपडे जळाली. स्फोटात चौहान कुटुंबीय होरपळले. स्फोटाचा आवाज झाल्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेतली. अग्निशमन दल, तसेच काळेपडळ पोलिसांना या घटनेची माहिती कळवण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. स्फोटात जखमी झालेल्या चौहान कुटुंबीयांना सुरुवातीला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कामाचा शोधात पुण्यात..

चौहान कुटुंबीय कामाच्या शोधात काही दिवसांपूर्वी पुण्यात आले होते. बुधवारी पहाटे गॅसचा वास येत असल्याने चौहान यांनी लायटर लावले. त्या वेळी सिलिंडरचा स्फोट झाला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा शेगडीचा एक बर्नर सुरू असल्याचे आढळून आले.

औंधमध्ये सदनिकेत आग ; तरुण जखमी

औंध गावातील सदनिकेत आग लागून तरुण जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. औंध गावातील गुरुद्वाराजवळ जुनवणे रेसिडेन्सी आहे. या इमारतीतील सदनिकेत बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. सदनिकेत दत्तात्रय किसन भंडलकर (३८) हे पेटलेल्या अवस्थेत होते. जवानांनी तातडीने भंडलकर यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. स्वयंपाक घरासह बेडरूममधील साहित्य जळाले होते. जवानांनी सदनिकेतून दोन सिलिंडर बाहेर काढले. सिलिंडरमधून गळती होत असल्याचे निदर्शनास आले. जवानांनी गळती रोखली, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

टॅग्स :PuneपुणेCylinderगॅस सिलेंडरhospitalहॉस्पिटलfire brigade puneपुणे अग्निशामक दलUttar Pradeshउत्तर प्रदेशFamilyपरिवार