शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंविरोधात पुणे स्मार्ट सिटीचे आक्षेपार्ह 'ट्विट' : शिवसेना आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 20:55 IST

सोशल मीडियाचे कंत्राट घेतलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्याचा प्रताप.... 

पुणे : 'स्मार्ट सिटी'च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह शेरेबाजी करणारे ट्विट करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. एकदा नव्हे तर दोनदा हे ट्विट करण्यात आले. हा प्रकार स्मार्ट सिटीच्या सोशल मीडिया हँडल करण्याचे काम घेतलेल्या दिल्लीच्या कंपनीच्या कर्मचाऱ्याने केल्याचे समोर आले आहे. शिवसेनेने आक्रमक होत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे ट्विटर अकाऊंट आणि सोशल मीडियाचे कंत्राट दिल्लीच्या 'कुटुंब एचआर' यांच्याकडे देण्यात आलेले आहे. आमदार निलेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान असलेले ट्विट दोन दिवसांपूर्वी केले होते. 'ज्याची सोसायटीचा वॉचमन व्हायची लायकी नाही. त्याला आमदार केल्यावर लोकांना त्रास भोगावाच लागतो. वरळीकर टीव्हीवर पेंग्विन बघितला, तरी शिव्या घालतायत म्हणून मतदान करताना विचार केला पाहिजे. नाहीतर असा मनस्ताप होतो.' असे या ट्विटमध्ये नमूद केले होते. 

स्मार्ट सिटीचे पुण्याचे काम पाहणाऱ्या सोशल मीडिया आयटी स्पेशलिस्टकडून सोशल मिडीयावर कंपनीशी संबधित नसलेले हे राजकीय स्वरुपाचे ट्विट शेअर करण्यात आले. ही बाब शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आली. पालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी पदाधिकाऱ्यांसह स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. संजय कोलते यांची भेट घेऊन हे ट्विट तात्काळ डिलीट करावे तसेच संबंधितांवर कारवाईची मागणी केली. 

स्मार्ट सिटीकडून संबंधीत महिला कर्मचाऱ्याला तात्काळ काढून टाकण्यात आले असून भविष्यात कोणत्याही कर्मचाऱ्याकडून अशा प्रकारची चूक झाल्यास कुटुंब एचआर कंपनीसोबत करण्यात आलेला करार रद्द करण्यात येणार असल्याचे सांगितले. यासोबतच सोशल  मिडीयाचे फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि स्मार्ट सिटी वेबसाईटचे कामकाज मुख्य अधिकारी अनिरुध्द शहापुरे यांचेकडे सोपविण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेAaditya Thackerayआदित्य ठाकरेSmart Cityस्मार्ट सिटी