शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

उपमुख्यमंत्र्यांनी 'झाडाझडती' घेतल्यानंतर पुणे स्मार्ट सिटीच्या मानांकनात मोठी सुधारणा; राज्यात अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 12:24 IST

गेल्याच आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काढले होते वाभाडे 

पुणे : स्मार्ट सिटीचे घसरलेले मानांकन सुधारण्यास सुरुवात झाली असून पुणेस्मार्ट सिटी राज्यात प्रथम तर देशात तेराव्या स्थानी पोचली आहे. गेल्याच आठवड्यात सुमार कामांवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाभाडे काढलेल्या स्मार्ट सिटीला या मानांकनामुळे दिलासा मिळाला आहे.

 स्मार्ट सिटीचे मानांकन घसरल्यामुळे टीका सुरू झाली होती. स्मार्ट सिटीकडून प्रकल्पांची माहिती वेळेत भरली जात नसल्याने हे मानांकन घसरले होते. त्यानंतर स्मार्ट सिटीकडून ही माहिती भरण्यास सुरुवात करण्यात आल्यावर हे मानांकन सुधारून १५ वर आले होते. त्यामध्ये आता सुधारणा झाली असून राष्ट्रीय मानांकनात पुणे तेराव्या स्थानी पोचले आहे. लॉकडाऊनपूर्वी पुणे सतराव्या क्रमांकावर होते. मॅनेजमेंट इन्फॉरमेशन सिस्टम्स (एमआयएस) प्रणालीमध्ये पुणे स्मार्ट सिटीकडून अद्ययावत माहिती भरली जाते आहे. संस्था किंवा कंपन्यांना कर्मचारी, उपकरणे आणि व्यवसाय प्रक्रियेत समन्वय ठेवण्यास व क्रमवारीत एमआयएस प्रणाली साह्य करते. ------- स्मार्ट सिटीने प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा वेग वाढवला असून चांगल्या प्रकल्पांमुळे स्मार्ट सिटी मिशनमधील शहराचे स्थान आणखी उंचावेल. नियोजित प्रकल्पांसोबतच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्येही माहिती व्यवस्थापनात पुढाकार घेतला आणि कमांड अँड कंट्रोल सेंटरचा वॉर रूम म्हणून अत्यंत प्रभावीपणे उपयोग केल्याचा सकारात्मक परिणाम दिसतो आहे. - मुरलीधर मोहोळ, महापौर -------- स्मार्ट सिटीने लॉकडाऊनपूर्वी सुरू केलेली कामे सुरू ठेवली आहेत. कोरोना प्रतिबंधासाठी स्मार्ट सिटीने आरोग्य माहिती व्यवस्थापन प्रणाली (एचएमआयएस) प्रकल्पाअंतर्गत नवे डिजिटल उपक्रम सुरू केले आहेत. स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून चांगले काम सुरू आहे. - डॉ. संजय कोलते, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे स्मार्ट सिटी---------- महाराष्ट्रातील शहरांचे राष्ट्रीय स्तरावरील मानांकन पुणे- १३ नाशिक- १८ ठाणे- २२ नागपूर- ३१ पिंपरी चिंचवड- ४१ सोलापूर- ५० कल्याण डोंबिवली- ६५ औरंगाबाद- ६८ 

टॅग्स :PuneपुणेSmart Cityस्मार्ट सिटीAjit Pawarअजित पवारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका