शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Pune: धक्कादायक! तीन अल्पवयीन मुली गर्भवती, एकाच दिवशी पोक्सोचे ३ गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 18:07 IST

एका दिवशी पोक्सो अंतर्गत ३ गुन्हे दाखल...

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याने अल्पवयीन मुली गर्भवती राहिल्या. याप्रकरणी एका दिवशी पोक्सो अंतर्गत ३ गुन्हे दाखल केले असून, दोघांना खडक व स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत एका अल्पवयीन मुलीने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अशोक अनिल काळे (वय १९, रा. अंबिका झोपडपट्टी) याला अटक केली. आरोपीने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. त्यातून ही मुलगी ८ महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले आहे.

गणेश पेठेत राहणाऱ्या एका १७ वर्षाच्या मुलीने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी प्रमोद महादेव ठोबळे (वय २८, रा. महात्मा फुले पेठ) याला अटक केली आहे. फिर्यादी आणि आरोपी प्रमोद यांची ओळख होती. त्यातून फिर्यादीच्या घरी कोणी नसताना प्रमोद तिच्या घरी आला. तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यातून ही मुलगी ३ महिन्यांची गर्भवती राहिली. त्यानंतर आता गुन्हा दाखल केला आहे.

महंमदवाडी येथे राहणाऱ्या एका महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी गणेश वाघमारे (वय २०,रा. चंदननगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांच्या १५ वर्षांच्या बहिणीस गणेश वाघमारे याने मे २०२३ ते २७ जुलै २०२३ दरम्यान वेळोवळी लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध केले. त्यातून ती दीड महिन्यांची गर्भवती राहिली आहे.

टॅग्स :MolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारीPuneपुणे