शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
4
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
5
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
6
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
7
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
8
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
9
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
10
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
11
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
12
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
13
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
14
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
15
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
16
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
17
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
18
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
19
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
20
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?

Pune RTO: उच्च सुरक्षा पाटी न लावलेल्या वाहनांना अडचणी येणार; खरेदी-विक्रीलाही ब्रेक लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 14:08 IST

वाहन हस्तांतरण, नोंदणी, पत्ता बदल व इतर कामे करू नये असे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले आहेत.

पुणे: राज्यात एक एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नंबर पाटी (एचएसआरपी) लावण्यात येत आहे; परंतु त्याला वाहनधारकांकडून कमी प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे उच्च सुरक्षा नंबर पाटी न लावलेल्या जुन्या वाहनांची नूतनीकरणाशिवाय कोणतीही कामे करू नये, असा आदेश परिवहन आयुक्तांनी सर्व प्रादेशिक परिवहन विभागांना (आरटीओ) दिले आहेत, तसेच उच्च सुरक्षा नंबर पाटीला नोंदणी केलेल्या वाहनधारकांची कोणतीही अडवणूक करू नका, अशा सूचनाही आरटीओंना दिल्या आहेत.

राज्य सरकारकडून १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नंबर पाटी लावण्याचे बंधनकारक केले आहे. पुण्यात २६ लाख वाहनांना सुरक्षा नंबर पाटी बसवावी लागणार आहे. पुणे वगळता राज्यात सुरक्षा नंबर प्लेट बसविण्यास नागरिकांना प्रतिसाद खूपच कमी दिसत आहे. या कामाला गती येण्यासाठी परिवहन आयुक्तांनी सर्व आरटीओंना सुरक्षा नंबर पाटी न बसवणाऱ्या वाहनांबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जुन्या वाहनांना सुरक्षा नंबर पाटी न बसवल्यास आरटीओत वाहनांसंदर्भात काही कामे करताना नागरिकांना अडचणी येणार आहेत. त्यामुळे वाहनधारकांनी तातडीने उच्च सुरक्षा नंबर पाटीसाठी नोंदणी करावी, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.

अशा आहेत आरटीओंना सूचना 

- उच्च सुरक्षा नंबर पाटी न लावलेल्या वाहनांना वाहन हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्रामध्ये (आरसी) पत्ता बदल करणे, वित्त बोजा चढवणे व उतरवणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र देणे, ना हरकत प्रमाणपत्र जारी करणे, वाहनांमध्ये बदल करणे ही कामे उच्च सुरक्षा नंबर पाटी लावल्याशिवाय करू नका.- परंतु ज्या नागरिकांनी सुरक्षा नंबर पाटीसाठी नोंदणी केली आहे. त्यांची अडवणूक करू नये. त्यांची खातरजमा करून, कामे वेळेत करून द्यावीत.

कोणतीही कामे होणार नाहीत 

जुन्या परिवहन संवर्गातील वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतणीकरण, परवानाविषयक कामकाज, खासगी संवर्गातील वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण ही कामे सुरू राहणार आहेत. त्याबाबत आरटीओंना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यामुळे वाहनांची खरेदी-विक्री, आरसी बुक व इतर कामात अडचणी येणार आहेत.

अशी आहे आकडेवारी

- पुण्यातील एकूण वाहने - २६ लाख ३३ हजार- सुरक्षा नंबर पाटीसाठी नोंदणी - ४ लाख ९४ हजार- सुरक्षा नंबर पाटी लावलेल्या वाहन संख्या- २ लाख ५० हजार- अर्ज न केलेली वाहन संख्या - २१ लाख ३९ हजार

टॅग्स :PuneपुणेRto officeआरटीओ ऑफीसbikeबाईकcarकारGovernmentसरकारMONEYपैसा