शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा अधिकार बजावा; राज ठाकरेंनी केले आवाहन
2
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
3
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
4
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
6
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
7
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
8
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
9
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
11
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
12
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
13
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
14
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
15
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
16
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
17
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
18
मतदानाच्या आदल्या दिवशी विनोद तावडे-राज ठाकरे भेट; मराठी मतांच्या बेरजेसाठी भेट झाल्याची चर्चा 
19
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
20
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही

पुणेकरांना यंदा लवकरच 'केसर' ची चव चाखता येणार; गुजरामधून शहरात आंबे दाखल

By अजित घस्ते | Published: May 14, 2023 4:54 PM

रत्नागिरी ,देवगड हापूसचा तुटवडा जाणवत असल्याने केसर आंब्याला चांगली मागणी

पुणे : रत्नागिरी ,देवगड हापूस आंब्याचा हंगाम संपत आल्यानंतर  गावरान आणि गुजरातचा केसर आंब्याचा हंगाम सुरू होतो. मात्र यावर्षी रत्नागिरी हापूर आंब्याचा बाजारात तुटवडा जाणवत होता. त्यामुळे मागणी असून ही हापूर आंबेची आवक कमी झाल्याने नागरिकांना यावर्षी हापूर आंब्याची चव चाखता आला नाही. मात्र यावर्षी केसर लवकर दाखल झाला आहे. यामुळे केसर आंब्याचा गोडवा वाढला असून या आठवड्यापासून केसर आंब्याची आवक बाजारात सुरू झाली आहे.

दरवर्षी मे महिन्याच्या १५ तारखेनंतर बाजारात गुजरातमधून केसर आंब्याची आवक बाजारात सुरू होते. जून, जुलैपर्यंत हा हंगाम सुरू असतो. पाऊस पडण्यास सुरुवात झाली की, हापूस खराब होत असल्याने अनेकजण तो खात नाहीत. त्यानंतर गुजरातच्या केसरची मागणी वाढते. मात्र यावर्षी हे आंबे लवकरच बाजारात दाखल झाले आहेत. त्यातच रत्नागिरी ,देवगड हापूस आंब्याचा बाजारात तुटवडा जाणवत असल्याने आवक कमी होत आहे. त्यामुळे यावर्षी केसर आंब्याला चांगली मागणी असून चांगला उठाव मिळत आहे.

गुजरातच्या जुनागड, वलसाड, वापी, धरमपूर, देगाम या ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात या केसर आंब्याची लागवड मोठया प्रमाणात केली जाते. रत्नागिरी हापूर आंब्यांचा हंगाम संपत आला की गुजरात केशर व गावरान केसरला ग्राहकांच्याकडून मागणी वाढते. एकदा की केशर आंबा दाखल झाला की त्याला मागणी ही वाढते आणि सामान्यांना परवडणा-या दरात मिळत असल्याने ग्राहकांच्याकडून मोठया प्रमाणात खरेदी केली जाते.यामुळे सामान्य नागरिक केसर गावरान आंब्याची वाटच पाहत असतात.त्यामुळे बाजारात यंदा हापूस आंब्याचा तुटवडा जाणवत असल्याने केसर आंब्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे.

घाऊक बाजारात केसर ६० ते ८० रुपये किलो गुलटेकडी कृषी उत्पन्न बाजार समितीत आता केसर आंब्याची आवक सुरू झाली आहे. सध्या ४०० ते ५०० आसपास पेट्या बाजारात येत असून साधारण १० ते १२ टन आवत सुरू आहे. घाऊक बाजारात केसर ६० ते ८० रुपये किलो आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात १०० ते १२० रुपये किलोने केसर आंबा मिळत आहे. पुढील आठवड्यात ही आवक आणखी वाढेल.  -सिध्दार्थ खैरे मार्केटयार्ड आंबे व्यापारी

टॅग्स :PuneपुणेMangoआंबाalphonsoहापूस आंबाfruitsफळेMarket Yardमार्केट यार्डGujaratगुजरात