शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
4
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
5
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
6
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
7
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
8
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
9
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
10
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
11
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
12
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
13
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
14
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
15
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
16
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
17
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
18
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
19
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
20
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश

पावसामुळे पुणेकरांची दाणादाण; सर्वत्र वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 15:19 IST

मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साठल्याने वाहतुकीचा वेग मंदावून शहरात वाहतूक कोंडी झाल्याचे दिवसभर पहायला मिळत होते.

पुणे - शहर व परिसरात गुरुवारी पहाटेपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पुणेकरांची चांगलीच तारांबळ आणि दाणादाण उडाली. शहराच्या विविध भागात पाणी शिरल्याच्या जवळपास ९० तक्रारी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे आल्या. मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साठल्याने वाहतुकीचा वेग मंदावून शहरात वाहतूक कोंडी झाल्याचे दिवसभर पहायला मिळत होते.

शहर व परिसरात गुरुवारी पहाटेपासून जोरदार पाऊस पडला. कमी वेळेत जास्त पाऊस पडल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. पावसाळी गटारे आणि महापालिकेने पाणी वाहून जाण्यासाठी तयार केलेल्या ड्रेनेज लाइनमध्ये कचरा अडकल्याने रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे दिवसभरात विविध भागातील रस्त्यांवर पाणी साचल्याच्या ९० तक्रारी आल्या. तक्रारी आल्यानंतर महापालिकेच्या विविध पथकांनी १० ते २५ मिनिटांमध्ये आवश्यक उपाययोजना केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, रस्त्यावर साठलेले पाणी काढून घेण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी सकाळपासूनच कामाला लागले होते. रस्त्यावर साठलेले पाणी तसेच इतर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर पथके नेमण्यात आली आहेत. याबरोबर पथ विभाग, मलनिस्सारण विभागातील कर्मचारी देखील रस्त्यावर उतरून काम करत होते. पाणी साठलेल्या रस्त्यावरील चेंबरचे झाकण उघडून पाण्याच्या प्रवाहाला वाट मोकळी करून दिली जात होती. अनेक भागात पाण्याचा निचरा कमी वेळेत करण्यास महापालिकेला यश आल्याने वाहतूक कोंडी सुटण्यास मदत झाली, असा दावा महापालिकेकडून केला जात आहे.

या भागात साचले पाणी

- धायरी भागातील रस्त्यावर पाणी साचल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. नऱ्हे, आंबेगाव, सिंहगड रस्ता, नवले पूल ते वारजे भागाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

- बोपोडी येथील भाऊ पाटील रस्त्यावर पावसाचे पाणी वाहून जाणारे चेंबर तुंबल्याने पाणी वाहून जाण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ड्रेनेजचे झाकण उघडून कचरा काढल्यानंतर पाणी वाहून गेले.

- पर्वतीकडून नीलायम चित्रपटगृहाजवळील पूल उतरून खाली आल्यानंतर डाव्या बाजूला असलेले झाड पडले. झाडाच्या फांद्या, कचरा चेंबरवर पडल्याने पाणी वाहून जाताना अडचण निर्माण झाली होती.

- आठवले चौक ते प्रभात रस्ता कॅनॉल रस्त्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराकडे जाणाऱ्या गल्लीच्या परिसरातील रस्त्यावर पाणी साचले होते.

- स्वारगेट चौक आणि हडपसरमधील सिद्धेश्वर हॉटेलसमोर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला.

- शहराच्या उपनगरांसह मध्यवर्ती पेठांचा भाग असलेल्या सदाशिव, नारायण, शनिवार पेठेसह शिवाजीमहाराज रस्ता आणि इतर रस्त्यांवरही वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

एकतानगरीसाठी स्वतंत्र पथक

मागील वर्षी खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सोडल्यानंतर सिंहगड रस्त्यावरील नदीकाठाजवळ असलेल्या एकतानगरी सोसायटीत पाणी घुसले होते. यंदाच्या वर्षी खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर त्याचा फटका एकतानगरीला बसू नये,यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. आपतकालीन स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी स्वतंत्र पथक येथे तैनात करण्यात आले आहे, असे उपायुक्त संदीप खलाटे यांनी सांगितले.

शहरात गुरुवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. खडकवासला धरणातून काही प्रमाणात पाणी सोडण्यास सुुरुवात झाली आहे. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाची पथके पाणी शिरण्याची शक्यता असलेल्या भागात जाऊन आवाहन करत आहेत. नदीकाठच्या नागरिकांनाही धोक्याचा इशारा दिला जात आहे. आतापर्यंत खडकवासला जवळच्या १२ ते १५ घरे वगळता इतर कोठेही पाणी शिरलेले नाही.  - गणेश सोनुने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, पुणे महापालिका

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड