पुणेकरांनी घेतला ‘अनलॉक’चा आनंद,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:14 IST2021-06-09T04:14:21+5:302021-06-09T04:14:21+5:30
पुणे : कोरोना नियंत्रणात आल्यामुळे शहरातील लॉकडाऊनचे निर्बंध सोमवारपासून (दि.७) शिथिल करण्यात आले. त्यामुळे पुणेकरांनी घराबाहेर पडून खरेदीचा ...

पुणेकरांनी घेतला ‘अनलॉक’चा आनंद,
पुणे : कोरोना नियंत्रणात आल्यामुळे शहरातील लॉकडाऊनचे निर्बंध सोमवारपासून (दि.७) शिथिल करण्यात आले. त्यामुळे पुणेकरांनी घराबाहेर पडून खरेदीचा आनंद घेतला. बाजारपेठांमध्ये आज गर्दी दिसून आली, तर रस्त्यावरही वाहने वाढल्याने अनेक ठिकाणी वाहतूककोंडीचा सामना करावा लागला.
राज्य सरकारच्या निर्देशानुसार पुणे शहरात आजपासून अनलॉक करण्यात आले. सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत सर्व दुकाने खुली राहणार आहेत. फक्त शनिवार, रविवार केवळ अत्यावश्यक सेवा सुरू असणार आहेत. शटर उघडा पण नियम पाळा, अशी ताकीद सरकारने दिलेली आहे. शहरात अनलॉक झाल्याने नागरिक विविध दुकानांमध्ये जाऊन खरेदी करताना दिसून आले. अनेक दुकाने गेली अनेक महिन्यांपासून बंदच होती. त्यामुळे आज पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला. तसेच सलून, जिम, पीएमपी सेवा सुरू झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
नागरिकांच्या चेहऱ्यावर मास्क दिसून आले, तर दुकानदारांनी देखील योग्य ती दक्षता घेतली होती. दुकानाबाहेरच सॅनिटायझर ठेवले होते. तसेच दुकानात गर्दी करू नये, अशा सूचनाही दिल्या होत्या.