शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा फुले वाड्याच्या कामाबाबत अजित पवार म्हणाले,'भुजबळ साहेब असतील किंवा इतर कोणीही वेदना होतातच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 10:15 IST

महात्मा फुले वाडा येथे सभा घेण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यानं माजी मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली होती

पुणे - महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करत महात्मा फुले यांच्या कार्याची आठवण करून दिली. या महापुरुषांच्या आदर्शांपुढे वाटचाल करत जातीय सलोखा वाढवायचा आहे. असं सांगत त्यांनी फुले वाडा परिसरातील स्मारक उभारणीसंदर्भात महत्त्वाचे वक्तव्य केलं.पवार म्हणाले,'फुले वाड्याच्या आजूबाजूची जागा घेऊन एक प्रेरणादायी स्मारक उभारायचं आहे. यासाठी पुणे महापालिका आयुक्तांशी मी चर्चा केली आहे. यात कुठलही राजकारण आणायचं कारण नाही. ज्यांच्या जागा घेतल्या जातील, त्यांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल. ते पुढे म्हणाले की, भुजबळ साहेब असतील किंवा इतर कोणी, काही वेदना होतातच. पण समाजाच्या हितासाठी हे पाऊल आवश्यक आहे. पुढील जयंतीपर्यंत यामध्ये मोठा फरक दिसून येईल.

दरम्यान, महात्मा फुले वाडा येथे सभा घेण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यानं माजी मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली होती. जमीन अधिग्रहणात पालिका अधिकारी टोलवाटोलवी करत आहेत. मी सरकारमधील घटक पक्षाचा आमदार असलो तरी उपोषण करायला मोकळा आहे. असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, दोन्ही नेत्यांच्या भूमिकांमधून स्पष्ट होतं की, फुले वाड्याच्या विकासासाठी सरकार आणि लोकप्रतिनिधी दोघंही गंभीर आहेत, मात्र अंमलबजावणीसाठी प्रशासनाने गती देण्याची गरज आहे.यावेळी अजित पवार यांनी  प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांची प्रमुख भूमिका असलेल्या आगामी 'फुले' सिनेमावरून होणाऱ्या वादावर भाष्य केले.ते म्हणाले, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारीत हा सिनेमा आहे. हा सिनेमा लवकरच रिलीज होणार होता. पण आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे गेल्याचं समजतंय. सेन्सर बोर्ड मध्ये वेगवेगळे मान्यवर आहेत. समाजावर काही परिणाम होणार आहे का याची शहानिशा केली जाते. संविधानाने स्वातंत्र्य दिलं आहे, लोकं काही बोलतात. चित्रपटातून कुठे तेढ निर्माण होणार नाही, असेही ते म्हणाले.   

टॅग्स :PuneपुणेChagan Bhujbalछगन भुजबळAjit Pawarअजित पवारMahatma Phule Wadaमहात्मा फुले वाडा