राजगड ( पुणे जि. ) - पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक राजगड किल्ला येथे फिरण्यासाठी आलेल्या एका पर्यटकाचा अचानक प्रकृती बिघडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (१४ फेब्रुवारी) दुपारी घडली. संदीप बाळकृष्ण पवार (वय ५२, रा. आरफळ, ता. सातारा, जि. सातारा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.वेल्हे पोलीस ठाणे येथून मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीतील सहकाऱ्यांच्या गटासह पवार हे सुट्टीच्या निमित्ताने खासगी वाहनाने राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आले होते. दुपारच्या सुमारास किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावरून खाली उतरत असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. सहकाऱ्यांनी तत्काळ त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला.घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदारांनी स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. स्ट्रेचरच्या साहाय्याने पवार यांना किल्ल्यावरून खाली आणण्यात आले. १०८ ॲम्बुलन्सशी संपर्क साधण्यात आला; मात्र विलंब होत असल्याने खाजगी वाहनाने त्यांना वेल्हे ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद वेल्हे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
Web Summary : A tourist died at Rajgad fort near Pune after collapsing. Sandeep Pawar, 52, from Satara, was with colleagues. He fell ill descending the fort. Rescuers brought him down, but doctors declared him dead at a hospital. Police are investigating.
Web Summary : पुणे के पास राजगढ़ किले में एक पर्यटक की गिरने से मौत हो गई। संदीप पवार, 52, सतारा के रहने वाले थे, अपने सहकर्मियों के साथ थे। किले से उतरते समय वह बीमार पड़ गए। बचाव दल उन्हें नीचे लाया, लेकिन डॉक्टरों ने उन्हें अस्पताल में मृत घोषित कर दिया। पुलिस जांच कर रही है।