शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Varandha Ghat : वरंधा घाटातून ३० सप्टेंबरपर्यंत वाहतुकीवर निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 19:07 IST

भोर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे वरंधा घाट परिसरात वारंवार दरडी कोसळण्याच्या घटना घडत

भोर : भोर तालुक्यात सततच्या मुसळधार पावसामुळे भोर-महाड रस्त्यावरील वरंधा घाटात बुधवारी पहाटे दरड कोसळण्याची घटना घडली. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी वरंधा घाटाची पाहणी केली. यावेळी त्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत अवजड वाहनांसाठी घाट पूर्णपणे बंद ठेवण्याचे, तसेच रेड आणि ऑरेंज अलर्टच्या काळात हलक्या वाहनांनाही बंदी घालण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

भोर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे वरंधा घाट परिसरात वारंवार दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. बुधवारी महाड हद्दीत कोसळलेल्या दरडीच्या पार्श्वभूमीवर भोर प्रशासनाने वरंधा घाटातील भोर हद्दीतील रस्ते, दरडी आणि संरक्षक भिंतींची पाहणी केली. यावेळी घाट परिसरातील नागरिक आणि हॉटेल व्यावसायिकांना सतर्क राहण्यासह प्रशासनाशी संपर्कात राहण्याच्या सूचना प्रांताधिकारी डॉ. खरात यांनी दिल्या.पाहणीदरम्यान निगुडघर मंडलाधिकारी रूपाली गायकवाड, ग्राम महसूल अधिकारी पल्लवी नांदे, अमीर शेख, आशिंपी उंबर्डेचे सरपंच प्रकाश उंब्राटकर, ग्रामपंचायत अधिकारी सुहास गायकवाड आणि ग्राम महसूल सेवक बबन अंबिके उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊस