शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे रेल्वे स्थानकाची सुरक्षा फक्त कागदावरच..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 20:27 IST

रेल्वे प्रशासनाकडून केवळ कागदावरच आराखडे तयार

ठळक मुद्देपुणे विभागामध्ये सध्या केवळ ४ मोठ्या स्थानकांवर सीसीटीव्ही विभागात ६०० हून अधिक कॅमेरे बसविण्याचे प्रस्तावित पुणे स्टेशन ते शिवाजीनगर परिसरामध्ये ७ अधिकृत तर ७ अनधिकृत ठिकाणांहून प्रवासी

पुणे : मागील काही वर्षात पुणेरेल्वे स्थानकावरील प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढत असताना रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षेच्याबाबत दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनीच दिलेल्या माहितीनुसार, स्थानकात १२ मेटल डिटेक्टर तर ५ सामान तपासणी स्कॅनरची गरज असताना सध्या केवळ दोन डिटेक्टर व एकच स्कॅनर आहे. तसेच आणखी ६३ सीसीटीव्ही कॅमेरेही गरजेचे आहेत. पण ही ‘गरज’ सध्या केवळ कागदावरच असून प्रत्यक्षात कधी येणार, याची खात्री रेल्वे अधिकाऱ्यांनाही नाही. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या नवनियुक्त व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी गुरूवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पुणे रेल्वे स्थानकासह विभागातील विविध स्थानकांवर सुरक्षेच्यादृष्टीने विविध उपाययोजना केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, मेटल डिटेक्टर, स्कॅनरचा समावेश आहे. रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) एकात्मिक सुरक्षा आराखडा तयार केला असून त्याअंतर्गत सुरक्षेसाठी आवश्यक बाबी नमुद करण्यात आल्या आहेत. या आराखड्यानुसार पुणे रेल्वे स्थानकाला एकुण १२ मेटल डिटेक्टर, ५ स्कॅनर तर ६३ सीसीटीव्ही कॅमेराची गरज आहे. सध्या स्थानकात असलेले मेटल डिटेक्टर, स्कॅनर खुप जुने आहेत. त्यामुळे ते सतत बंद असतात. पुणे विभागामध्ये सध्या केवळ ४ मोठ्या स्थानकांवर सीसीटीव्ही आहेत. आणखी १८ स्थानकांवर सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत. विभागात ६०० हून अधिक कॅमेरे बसविण्याचे प्रस्तावित आहे. मागील काही वर्षांपासून हीच स्थिती असताना रेल्वे प्रशासनाकडून केवळ कागदावरच आराखडे तयार केले जात आहेत. ही कामे टप्याटप्याने केली जाणार असल्याचे आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचबरोबर पुणे स्टेशन ते शिवाजीनगर रेल्वे मार्गाच्या परिसरामध्ये ७ अधिकृत तर ७ अनधिकृत ठिकाणांहून प्रवासी येतात. त्यापैकी २ अनधिकृत ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. उर्वरीत ५ ठिकाणेही लवकरच बंद केली जाणार आहेत. प्रवाशांची सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी ही पावले उचली जात असल्याचे शर्मा यांनी सांगितले. ------------------

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेpune railway stationपुणे रेल्वे स्थानक