पुणे : निवडणूक कार्यालयात काँग्रेस-भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा
By Admin | Updated: February 7, 2017 16:18 IST2017-02-07T14:09:47+5:302017-02-07T16:18:31+5:30
पुण्यातील निवडणूक कार्यालयात काँग्रेस-भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.

पुणे : निवडणूक कार्यालयात काँग्रेस-भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ७ - पालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाच पुण्यात काँग्रेस-भाजपा कार्यकर्त्यांमध्ये मारामारीची घटना घडली. काँग्रेसचे रवी घंगेकर आणि भाजपाच्या गणेश बिडकर यांच्यात जोरदार वाद झाल्याने दोघांचे कार्यकर्तेही मध्ये पडले आणि त्यांच्यातच शिवीगाळ होऊन प्रकरण मारामारीपर्यंत पोहोचले.
कर्मचा-यांनी त्यांना आत सोडण्यास नकार दिला असता काही कार्यकर्त्यांनी बिडकरांसोबत इतरांना कसे आत सोडले असा प्रश्न विचारला. तेव्हा पोलिसांनी घंगेकरांसह इतरांना बाहेर जाण्यास सांगितले. मात्र बिडकरांच्या उपस्थितीवर कोणताही आक्षेप घेतला नाही. यावरून दोन्ही गटात पुन्हा वादावादी झाली आणि त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले.
याप्रकरणी निवडणूक अधिकारी विजया पांगारकर यांनी येथे 144 कलम जारी केले आहे. तसेच कठोर कारवाईचा इशारा दिला.