शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Porsche Car Accident : अल्पवयीन कारचालकाची आई शिवानी अग्रवाल पोलिसांच्या ताब्यात; 'बाळा'ला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल बदलल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 08:17 IST

कल्याणीनगर अपघात प्रकरणात 'बाळा'च्या रक्ताच्या नमुन्याऐवजी अन्य दुसऱ्या कुणाचे रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणात ते रक्त अल्पवयीन कारचालकाच्या आईचेच असल्याचा संशय पोलिसांना होता.

किरण शिंदे -

कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिसांनी आता अल्पवयीन कार चालकाची आई शिवानी अग्रवाल यांना ताब्यात घेतले आहे. यापूर्वी पुणे पोलिसांनी अल्पवयीन कारचालकाचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनाही अटक केली आहे. हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास पोलिसांनी शिवानी अग्रवाल यांनाही ताब्यात घेतले आहे. 

कल्याणीनगर अपघात प्रकरणात 'बाळा'च्या रक्ताच्या नमुन्याऐवजी अन्य दुसऱ्या कुणाचे रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणात ते रक्त अल्पवयीन कारचालकाच्या आईचेच असल्याचा संशय पोलिसांना होता. याशिवाय ससून रुग्णालयात या अल्पवयीन कारचालकाला आणण्यात आल्यानंतर मोठी हेराफेरी झाली होती. या अल्पवयीन कारचालकाच्या ब्लड सॅम्पल ऐवजी दुसऱ्याचेच सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास पुणे पोलीस करत आहेत. 

दरम्यान सध्या बालसुधारगृहात असलेल्या या अल्पवयीन कारचालकाकडे चौकशी करण्यासाठी पुणे पोलिसांनी परवानगी मागितली होती. त्यानंतर बाल न्याय मंडळाकडून अल्पवयीन आरोपीची चौकशी करण्याची पुणे पोलिसांना परवानगी मिळाली आहे. पुणे पोलीस आज २ तास अल्पवयीन आरोपीची चौकशी करणार आहेत. या चौकशी वेळी त्याची आई शिवानी अग्रवाल यांना देखील पोलीस त्या ठिकाणी घेऊन जातील अशी शक्यता आहे.

दाखल गुन्ह्यानुसार, १९ मे रोजी रात्री अडीचच्या सुमारास एका 'बाळा'ने दारू पिऊन त्याच्याकडील पोर्शे कारने दुचाकीवरून जाणाऱ्या तरूण-तरुणीला उडवले होते. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर समाज माध्यमांवर पोलिसांवर तसेच अन्य यंत्रणांवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. याप्रकरणी बाळाच्या वडिलांसह त्याच्या आजोबांनादेखील अटक झाली होती. त्याला मद्य पुरवणाऱ्या पब चालकासह मॅनेजरलादेखील अटक झाली होती. याप्रकरणात येरवडा पोलिसांनी दिरंगाई केल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर व पोलिस कन्ट्रोल रूमला माहिती न कळवल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले होते.

टॅग्स :Pune Porsche Accidentपुणे पोर्श अपघातPoliceपोलिसAccidentअपघात