शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

पुणे : व्याधीग्रस्त गरीब ज्येष्ठांनाही मिळतोय वैद्यकीय सेवेचा आधार! आतापर्यंत ४५०० जणांना लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 12:50 PM

संसर्गजन्य आजारात सर्वाधिक बळी हे वृध्द व अन्य आजार जडलेल्या व्यक्तींचे जातात  हे कोरोना आपत्तीने अधोरेखित केले आहे.

ठळक मुद्देशहरातील १२ वस्त्यांमधील साडेचार हजार ज्येष्ठ नागरिकांना याव्दारे नियमित औषधोपचार संसर्गजन्य आजारात ज्येष्ठांकडे विशेष लक्ष देण्यासाठी पालिकेचाही पुढाकार  औधोपचाराबरोबरच मानसिक आधार देणे, फिजिओ थेरपीसाठी यंत्रणा उपलब्ध करून देण्याची गरज

निलेश राऊत- पुणे : शहरातील झोपडपट्टी भागात उपचारावाचून दुर्लक्षित राहिलेल्या ज्येष्ठ व गरीब व्यक्तींना शोधून, त्यांना रक्तदाब, मधूमेह सारख्या व्याधींवर औषधे देण्याबरोबरच त्यांना मानसिक आधार देण्याचे काम शहरातील स्वयंसेवी संस्थांकडून होत आहे. या कामाला आता महापालिकेच्या आरोग्य विभागानेही साथ दिली असून, या ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष ओपीडी (प्राथमिक आरोग्य तपासणी केंद्र) उभारण्याची कार्यवाही सुरू केली आहे.      सोसायटी ऑफ कम्युनिटी हेल्थ ओरियंटेड ऑपरेशन (स्कूल) व पुणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने मे २०२० पासून शहरातील झोपडपट्टी भागात व्याधीग्रस्त गरीब ज्येष्ठांसाठी हा उपक्रम राबविला जात आहे. आजपर्यंत शहरातील १२ वस्त्यांमधील साडेचार हजार ज्येष्ठ नागरिकांना याव्दारे नियमित औषधोपचार देण्याचा प्रयत्न केला गेला असून, या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्याकरिता पालिकास्तरावर आणखी भरीव सहभागाची आवश्यकता आहे. यामुळेच महापालिकेनेही केंद्राच्या ‘राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान’(एनयुएचएम) अंतर्गत याची आखणी करून, त्याकरिता स्वतंत्र आर्थिक तरतूदीसाठी प्रस्ताव दाखल करण्यास प्रारंभ केला आहे.     

संसर्गजन्य आजारात सर्वाधिक बळी हे वृध्द व अन्य आजार जडलेल्या व्यक्तींचे जातात  हे कोरोना आपत्तीने अधोरेखित केले आहे. यामुळे सर्वच शासकीय यंत्रणांनी सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून अशा व्यक्तींना शोधून त्यांना वेळीच उपचार देण्याची कार्यवाहीही सुरू केली. परंतु, काही स्वयंसेवी संस्थाही हेच काम पूर्वीपासून करीत आहेत. ‘स्कूल’या संस्थेव्दारे शहरातील २५ झोपडपट्ट्यांमधील ४ हजार ८०० गरीब ज्येष्ठ नागरिकांची आत्तापर्यंत तपासणी करण्यात आली असून, यासर्वांना अन्य दानशूर संस्था व व्यक्तींच्या माध्यमातून व्हिल चेअर, आधारकाठी, चष्मे तथा अन्य वैद्यकीय सहाय्यक वस्तू तसेच नियमित मल्टि विटॅमिनच्या गोळ्या दिल्या जात आहेत. याला महापालिकेनेही मदत केली असून, बीपी शुगर असलेल्या या ज्येष्ठांना स्कूलच्या माध्यमातून नियमित औषधे पुरविण्यास नुकतीच सुरूवात केली आहे.    ---------------------साडेचार हजाराहून अधिक ज्येष्ठांच्या नोंदी व औषधोपचार स्कूल संस्थेच्या माध्यमातून शहरातील १२ वस्त्यांमधील साडेचार हजार गरीब ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणी करून त्यांच्या आजाराच्या नोंदी ठेवण्यात आल्या आहेत़ यात सुमारे ६५७ उच्च रक्तदाब, ६४६ मधुमेह, ५१ फ्र क्चर, ७४ अर्धांगवायू, गुडघेदुखीचे ९३८, मोतिबिंदू असणारे ९५५ असे रूग्ण आहेत. तर मानसिक आधार नसल्याने खचलेले ही शेकडो ज्येष्ठ औषोधोपचाराच्या व आधाराच्या प्रतिक्षेत आहेत.     या सर्वांना औधोपचाराबरोबरच मानसिक आधार देणे, फिजिओ थेरपीसाठी यंत्रणा उपलब्ध करून देण्याची सध्या गरज आहे.---------------------अभियानाची आवश्यकता कोरोना आपत्तीत पुण्यात जेवढे मृत्यू झाले त्यात अन्य व्याधीग्रस्त व्यक्ती तथा वय वर्षे ६० वरील व्यक्तींचे मृत्यूचे प्रमाण हे ८५ टक्क्यांपर्यंत आहे़ अनेक ज्येष्ठ नागरिक हालाखीच्या परिस्थितीमुळे बी़पी़शुगरसारख्या आजारांकडे दुर्लक्ष करतात़ परिणामी यांनाच या संसर्गजन्य आजारात सार्वधिक धोका उद्भवतो. त्यामुळे शहरातील दुर्लक्षित राहिलेल्या या वर्गाकडे वेळीच लक्ष दिले व त्यांना नियमित औषोधोपचार देण्याची यंत्रणा उभारली तर मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. याकरिता वय वर्षे ६० वरील गरीब ज्येष्ठांकरिता स्वतंत्र ओपीडीची मागणी होत असून, त्यास महापालिकेनेही होकार दिला. -------------------स्कूल व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील गरीब वृध्दांसाठी राबविण्यात येणारा हा देशातील एकमेव प्रकल्प आहे. तत्कालीन महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी यात पुढाकार घेऊन, वृध्दांसाठी विशेष विकली  ओपीडी सुरू करणे, स्पेशल जेरियाट्रिक युनिट सुरू करणे व फिजियो थेरपी युनिट सुरू करण्याबाबत सांगितले आहे़ या सर्व सुविधा ‘राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान’(एनयुएचएम) अंतर्र्गत सुरू करण्यासाठी पालिकेने कार्यवाही सुरू असून, लवकरच ज्येष्ठांसाठी स्वतंत्र ओपीडी सुरू होतील.डॉ. कल्पना बळीवंत, सहाय्यक आरोग्य अधिकारी पुणे महापालिका.----------------------स्कूल संस्थेच्या माध्यमातून शहरातील या सर्वांना औषधोपचाराबरोबरच मानसिक आधार देणे, फिजिओ थेरपीसाठी यंत्रणा उपलब्ध करून देण्याची सध्या गरजधोपचार न मिळणाऱ्या गरीब ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करून त्यांची नोंद ठेवण्यात येत असून, त्यांना नियमित औषधे देण्यात येत आहेत. कोरोनासारखे संसर्गजन्य आजार येतील व जातील, परंतु या काळात अन्य व्याधीग्रस्त ज्येष्ठांना वेळेत औषधोपचार मिळत असेल, तर मृत्यूदर आटोक्यात येऊ शकेल. यासाठी अशा गरीब जेष्ठांना मोफत ओपीडी सुरू करण्याबाबत पालिकेकडे मागणी केली असता त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. डॉ. बेनझीर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्कूल़ 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMedicalवैद्यकीयHealth Tipsहेल्थ टिप्स