शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे पोलिसांचा डिजिटल चार्जशीटवर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 13:14 IST

पुणे पोलीस यापुढे न्यायालयात डिजिटल चार्जशिट दाखल करण्यावर भर देणार आहे़.

ठळक मुद्दे८९ खटल्यातील दोषारोपपत्र डिजिटल स्वरुपात दाखलपोलीस ठाण्यात त्याची लायब्ररी केली तर ते ठेवणे सोयीचे प्रतिसाद लक्षात घेऊन लवकरच सर्व पोलीस ठाण्यांमध्ये ही योजना राबविण्यात येणार

पुणे : वर्षानुवर्षे रेंगाळणारे खटले आणि त्यातील शेकडो पानांचा गठ्ठा सांभाळत बसण्याचा त्रास वाचविण्यासाठी पुणे पोलीस यापुढे न्यायालयात डिजिटल चार्जशिट दाखल करण्यावर भर देणार आहे़. सध्या पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ १मधील दोषारोपपत्र प्रायोगिक तत्वावर डिजिटल स्वरुपात न्यायालयात दाखल करण्यास सुरुवात केली आहे़. आतापर्यंत एकूण ८९ दोषारोपपत्र डिजिटल स्वरुपात न्यायालयात सादर करण्यात आली आहेत़. लवकरच याचा अवलंब शहरातील सर्व पोलीस ठाण्यात करण्यात येणार आहे़. गुन्ह्यातील सर्व जाबजबाब, साक्षीपुरावे हे सर्व एकत्रित करुन ते न्यायालयात सादर केले जाते़. अनेक गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र हे शेकडो तसेच काही गुन्ह्यांमध्ये तर ते हजारो पानांचे असते. ते जपून ठेवणे़ त्यातील महत्वाच्या गोष्टी जेव्हा लागतील, तेव्हा संबंधित वकील, तपास अधिकारी यांना उपलब्ध करुन देणे अनेकादा जिकीरीचे जाते़. बऱ्याचवेळा या दोषारोपत्रातील नेमकी कोणती माहिती सरकारी वकील, तपास अधिकाऱ्यांना हवी आहे, हे संबंधित रेकॉर्ड ठेवणाऱ्यांना माहिती होत नाही़. त्याचा शोधाशोध करण्यात वेळा जातो़. त्यावर पर्याय म्हणून ही सर्व कागदपत्रे सीडीच्या स्वरुपात साठवून ठेवून ती आवश्यक तेव्हा वापरली जाते़. खटल्यातील सर्व पाने, पुरावे स्कॅन केले जाते व ते एका सिडीमध्ये साठविले जाते़. ही सिडी न्यायालयात सादर केली जाते़. तसेच मुख्य कागदपत्रे न्यायालयात दिली जातात़. खटल्यात जेवढे आरोपी आहेत, त्या सर्वांना दोषारोपपत्र सिडीच्या स्वरुपात दिले जाते़. याचा फायदा तपास अधिकारी, सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलांनाही होऊ लागला आहे़. या डिजिटल चार्जशिटला मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेऊन लवकरच ती शहरातील सर्व पोलीस ठाण्यात राबविण्यात येणार आहे़ .़़़़़़़़़़़सर्वांना फायदेशीर योजनाचार्जशिट डिजिटल स्वरुपात दिल्याने तपास अधिकारी, वकिल हे आपल्या वेळेनुसार ऑफिसमध्ये, घरी बसून त्याचा अभ्यास करु शकतात़. तसेच पोलीस ठाण्यात त्याची लायब्ररी केली तर ते ठेवणे सोयीचे होईल़. सध्या वेगवेगळ्या खटल्यांची हजारो पाने सांभाळून ठेवणे जागेमुळे जिकरीचे होऊ लागले आहे़. डिजिटल चार्जशिटला मिळत असलेल्या प्रतिसाद लक्षात घेऊन लवकरच सर्व पोलीस ठाण्यांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे़.शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा़

़़़़़़़़़़परिमंडळ १ मधील डिजिटल चार्जशिट दाखल पोलीस ठाणे    २०१८    २०१९खडक                ०    ३०फरासखाना       ४    २६समर्थ               ३    ८विश्रामबाग        २    १०शिवाजीनगर    २    २डेक्कन              ०    २़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़एकूण             ११    ७८

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी