शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पालखीमार्गात घुसणाऱ्यांवर पुणे पोलीस कारवाई करणार :भक्ती शक्ती संगमावर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 18:37 IST

परंपरागत पद्धतीने व नियमानुसार चालत आलेल्या पालखी सोहळ्यात कोणत्याही संघटनेकडून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर पोलीस प्रतिबंधात्मक कारवाई करतील असा थेट इशारा माहिती विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त मितेश घट्टे यांनी दिला आहे. Pune police will take action against infiltrators in Palkhi

पुणे :परंपरागत पद्धतीने व नियमानुसार चालत आलेल्या पालखी सोहळ्यात कोणत्याही संघटनेकडून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर पोलीस प्रतिबंधात्मक कारवाई करतील असा थेट इशारा माहिती विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त मितेश घट्टे यांनी दिला आहे. शिवाय अशा संघटनांना रोखण्यासाठी अधिक पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी की, मागील काही वर्षांपासून संभाजी भिडे गुरुजी आणि त्यांच्या शिवप्रतिष्ठानचे धारकरी पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचा प्रयत्न करत आहेत. मागील वर्षी शहरातील शिवाजीनगर भागात शंभरपेक्षा अधिक धारकरी यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले होते. मात्र स्वतः गुरुजी यांनी पालखीचे दर्शन घेतले होते. त्यावेळीही परंपरा मोडल्याचे मत व्यक्त करत पालखी प्रमुख आणि काही वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे यंदा हा भक्ती शक्तीचा संगम होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेपालखी सोहळ्याच्या नियोजनाच्या पार्श्वभुमीवर नुकतीच  पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम् यांनी दोन्ही पालखी सोहळ्याच्या  प्रमुखांसह, मानकरी, चोपदार व विश्वस्तांची पोलिस अधिकार्‍यांसह एकत्र बैठक घेतली. यावेळी शिवप्रतिष्ठान संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने  शक्ती प्रदर्शन करत पालखी मार्गात प्रवेश करुन अडथळा निर्माण करतात. त्यामुळे पालख्यांना निर्धारीत ठिकाणी पोहचण्यास विलंब होतो असे म्हणत, पालखी सोहळ्यात अडथळा निर्माण करणार्‍यांची योग्य ती खबरदारी पोलिसांनी घ्यावी अशी मागणी प्रमुखांच्या वतीने करण्यात आली होती. त्यामुळे या मागणीची दखल पोलिसांनी घेतली असून, संभाव्य प्रकार टाळण्यासाठी पोलिसांच्या वतीने खास तयारी करण्यात आली आहे. तसेच  त्यासाठी वेगळा पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.

टॅग्स :sant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीPoliceपोलिस