शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

नामदेव जाधव यांना काळं फासणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अडचणी; पोलिसांकडून गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 18:23 IST

शरद पवार यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काल पुण्यातील नवी पेठ येथे नामदेव जाधव यांच्या चेहऱ्यावर काळं फासलं होतं.

पुणे : मराठा आरक्षण प्रश्नावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालं आहे. छगन भुजबळ यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शवल्यानंतर भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. तर दुसरीकडे, नामदेव जाधव यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मराठा नसल्याचा दावा करत सोशल मीडियावर वादाला तोंड फोडलं. तसंच शरद पवार यांच्यामुळेच आजवर मराठा समाज आरक्षणापासून दूर राहिल्याचा दावाही त्यांनी केला. जाधव यांच्याकडून शरद पवार यांच्यावर सातत्याने होत असल्याच्या आरोपांमुळे आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काल पुण्यात नामदेव जाधव यांच्या चेहऱ्यावर काळं फासलं. या घटनेप्रकरणी आता विश्रामबाग पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुण्यातील नवी पेठ येथील पत्रकार भवनासमोर शनिवारी सायंकाळी नामदेव जाधव यांना काळ फासण्यात आलं होतं. त्यानंतर जाधव यांच्या तक्रारीनुसार, विश्रामबाग पोलिसांनी राष्ट्रवादीच्या १० ते १५ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

पुण्यात काल नेमकं काय घडलं?

राष्ट्रवादीच्या इशाऱ्यानंतर काल भांडारकर इन्स्टिट्यूट येथे होणाऱ्या नामदेव जाधव यांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर नामदेव जाधव हे पत्रकारांशी संवाद साधत असताना राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते पत्रकार भवनाजवळ आले आणि त्यांनी जाधव यांना काळं फासलं. तसंच कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांना धक्काबुक्की केल्याने काही काळ घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी सदर कार्यकर्त्यांना अडवत नामदेव जाधव यांना कारमध्ये बसवलं.  

दरम्यान, "विचारांची लढाई विचारानेच लढायला हवी. मी कागद दाखवतो, पण समोरचे लोक दंडुके दाखवतात. हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे असं तुमचे नेते सांगतात. पण जर तुमच्या हातून असं कृत्य घडलं तर तुमच्याच नेत्याच्या प्रतिमेला धक्का बसेल. जिजाऊंच्या वंशजाच्या तोंडाला काळे फासलं म्हणून तुम्हाला कदाचित यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीसमोर बसून आत्मक्लेष उपोषणाला बसावं लागेल," असं म्हणत नामदेव जाधव यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना डिवचलं होतं.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaratha Reservationमराठा आरक्षणPuneपुणे