शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Pune Police: पुणे पोलिसांची मान शरमेने खाली; तीन पोलिसांचा मद्यधुंद अवस्थेत हॉटेलात धिंगाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 20:22 IST

सोमवारी मध्यरात्री मुंढवा परिसरातील मेट्रो हॉटेलमध्ये हा प्रकार घडला

पुणे प्रतिनिधी/किरण शिंदे : पुणेपोलिसांची मान शरमेने खाली जाईल असे कृत्य पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी केले आहे. मुंढवा परिसरातील एका हॉटेलमध्ये दारूच्या नशेत या तीन पोलीस कर्मचार्‍यांनी भयंकर राडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. दारू पिल्यानंतर आणखी दारूची मागणी करून न देणाऱ्या मॅनेजरला या तिघांनी मारहाण केली. सोमवारी मध्यरात्री मुंढवा परिसरातील मेट्रो हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. या तीनही पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीस अंमलदार उमेश मरीस्वामी मठपती (२९, रा. सोमवार पेठ), अमित सुरेश जाधव ( ३७,  रा. भवानी पेठ) आणि योगेश भगवान गायकवाड (३२, रा. केशवनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत हॉटेल मॅनेजर कुनाल दशरथ मद्रे (२७, रा. घोरपडीगाव) यांनी फिर्याद दिली आहे. मुंढवा पोलीस ठाण्यात मारहाण तसेच मुंबई दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी मद्रे हे मेट्रो लाऊंज हॉटेलमध्ये मॅनेजर आहेत. सोमवारी रात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास हॉटेल बंद करण्याच्या तयारीत होते. यावेळी पोलिस अंमलदार उमेश मठपती, अमित जाधव आणि योगेश गायकवाड हॉटेलमध्ये आले. त्यांनी बार काऊन्टरवर मद्य प्राशन केले. यानंतर आणखी दारूची मागणी केली. तसेच, शिवीगाळ करीत येथील रोहित काटकर याला हाताने मारहाण केली. एवढेच नाही तर मोठमोठ्या आवाजात धमकी देऊन हॉटेलमधील बार काऊंटरवर धिंगाणा घातला. 

या सर्व प्रकाराची माहिती मुलगा पोलिसांना समजतात पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. यानंतर या तीनही कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मठपती हे फरासखाना पोलीस ठाण्यात, जाधव हे समर्थ वाहतूक विभाग आणि गायकवाड हे चंदननगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीhotelहॉटेल