एटीएम मशीन चोरून लाखो रुपये लंपास करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी केला पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 18:27 IST2018-01-10T18:18:10+5:302018-01-10T18:27:59+5:30

एटीएम मशीन चोरून त्यातील लाखो रुपये लंपास करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पदार्फाश केला. याप्रकरणी पोलिसांनी कोल्हापूर येथून एक आणि कर्नाटक राज्यातून ४ अशा पाच जणांना अटक केली आहे.

Pune police have arrested gang that steals the ATM machine and looted lakhs of rupees | एटीएम मशीन चोरून लाखो रुपये लंपास करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी केला पर्दाफाश

एटीएम मशीन चोरून लाखो रुपये लंपास करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी केला पर्दाफाश

ठळक मुद्देबहुचर्चित फास्ट अ‍ॅन्ड फ्युरियस - ४ हा चित्रपट पाहून त्यातील कल्पना वापरली प्रत्यक्षातपोलिसांनी कोल्हापूर येथून एक आणि कर्नाटक राज्यातून ४ अशा पाच जणांना केली अटक

पुणे : हॉलिवूडचा बहुचर्चित फास्ट अ‍ॅन्ड फ्युरियस - ४ हा चित्रपट पाहून त्यातील कल्पना प्रत्यक्षात वापरून एटीएम मशीन चोरून त्यातील लाखो रुपये लंपास करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पदार्फाश केला. याप्रकरणी पोलिसांनी कोल्हापूर येथून एक आणि कर्नाटक राज्यातून ४ अशा पाच जणांना अटक केली आहे. आरोपींनी सात एटीएम मशीन चोरून त्यातील लाखो रुपये लंपास केल्याचे निष्पन्न झाले आहे.
दिलीप मोरे (वय ५२, रा. कोल्हापूर ), शिरीज महमूद बेग जमादार (वय ४१, बेळगाव, कर्नाटक), मोहीद्दीन जाफर बेग जमादार (वय ४३, बेळगाव, कर्नाटक), दादापीर तहसीलदार (वय ३८, बेळगाव, कर्नाटक) आणि मलीकजान हनिकेरी (वय ५२, बेळगाव, कर्नाटक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

Web Title: Pune police have arrested gang that steals the ATM machine and looted lakhs of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे