शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे पोलिसांची शहरातील अवैध धंद्याविरुद्ध 'मोठी अ‍ॅक्शन'! तब्बल ३८ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 20:58 IST

गुन्हे शाखेच्या पथकानी वेगवेगळ्या भागात सुरु असलेल्या जुगार अड्यांवर छापे

ठळक मुद्देबेकायदा गावठी दारु तसेच ताडी विक्री प्रकरणात ७ गुन्हे दाखलकोंढव्यात गुटखासह पकडला टेम्पो

पुणे : शहरात वेगवेगळ्या भागात सुरु असलेल्या अवैध धंद्यावर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले आहे. गुन्हे शाखेच्या पथकानी वेगवेगळ्या भागात सुरु असलेल्या जुगार अड्यांवर छापे टाकून ३८ जणांना अटक केली. या कारवाईत जुगार खेळण्याचे साहित्य आणि रोकड जप्त करण्यात आली.डेक्कन जिमखाना येथे सुरु असलेल्या जुगार अड्यावर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी धाड टाकली होती.  शहरातील मध्य भाग, स्वारगेट, दत्तवाडी, वारजे, येरवडा, हडपसर, बंडगार्डन, सहकारनगर परिसरात सुरु असलेल्या जुगार अड्यांवर कारवाई करण्यात आली़ त्यात ४८ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. 

बेकायदा गावठी दारु तसेच ताडी विक्री प्रकरणात ७ गुन्हे दाखल करण्यात आले़ या कारवाईत ४६४ लिटर गावठी दारु, १२० लिटर ताडी जप्त करण्यात आली़ ७ जणांना अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त बच्चनसिंह यांनी दिली. 

कोंढव्यात गुटखासह टेम्पो पकडलाकोंढवा भागातील अजमेरा पार्क परिसरात अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या पथकाकडून तंबाखुजन्य पदार्थ व पान मसाला यावर कारवाई करण्यात आली. सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार प्रदीप टिळेकर, रमेश चौधर, मयुर सूर्यवंशी यांना मिळालेल्या माहितीनुसार टेम्पोतून गुटखा वाहतूक करताना पकडण्यात आले़ त्यात भवरलाल पेमारामजी भाटी (वय २८, रा़ अजमेरा पार्क, कोंढवा खुर्द) याला पकडण्यात आले.  

या कारवाईत टेम्पो तसेच गुटख्याची १२० पोती असा १५ लाख ७२ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. स्वारगेट परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २५ हजार ५०० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक