शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे पोलिसांना गुंगारा देणारे खुन प्रकरणातील दोन आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2022 20:02 IST

आष्टी पोलिसांनी आवळल्या कड्यात मुसक्या

कडा : हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात कारणावरून खून करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या २ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. गौरव कारकिले, राजु सोनवणे दोघे (रा.महादेवनगर हडपसर पुणे) अशी त्यांची नावे आहेत.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस ठाणे हद्दीत मांजरी परिसरातील गणेश निवास अलाहाबाद बॅकेच्या बाजुला महादेव नगर येथे ५ जुन रोजी सागर गिरीधर दासमे (वय वर्ष २७) यांचा अज्ञात कारणावरून आरोपी गौरव कारकिले, राजु सोनवणे यांनी खून केला होता. हडपसर पोलीस ठाण्यात सागर दामसे यांचा भाऊ लखन गिरीधर दासमे याच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा पासून सदरील आरोपी हे पुणे पोलिसांना गुंगारा देत फिरत होते. पुणे पोलिसांनी आरोपीचे वर्णन व माहिती आष्टी पोलिसांना दिल्याने आष्टी पोलिसांनी पाळत ठेवून नगरवरून बीडकडे जात असताना रविवारी दुपारी अखेर त्या खुन प्रकरणातील दोन आरोपीच्या कडा येथील जुन्या बसस्थानक परिसरात  मुसक्या आवळल्या. आष्टी पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. 

ही कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर, पोलीस निरीक्षक सलिम चाऊस याच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेद्र पवार, पोलिस हवालदार बाबासाहेब गर्जे, बाबासाहेब राख, पोलिस शिपाई बंडु दुधाळ, महेश जाधव, पोलिस मित्र सचिन औटे यांनी केली.

टॅग्स :PoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू