शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

Pune Police: शहरात ७ नवीन ठाणी; पुणे पोलीस दलात भरणार कंत्राटी पद्धतीने पोलीस कर्मचारी

By विवेक भुसे | Updated: July 25, 2023 11:20 IST

शहर पोलीस दलात ७ हजार पोलीस कर्मचारी असून ८०० पोलीस कर्मचार्‍यांची नुकतीच भरती करण्यात आली

पुणे : शहर पोलिस दलात नव्याने ७ पोलीस ठाणी होणार असून आताच मोठ्या प्रमाणावर पोलीस अंमलदारांची कमतरता जाणवत असताना या नवीन ७ पोलीस ठाण्यांच्या निर्मितीमुळे आणखी उणीव भासणार आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून हंगामी तत्वावर पोलीस कर्मचारी भरण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर ३ हजार पोलीस कर्मचार्‍यांची कमतरता आहे. सर्व विहित मार्गाने प्रत्यक्ष भरती प्रक्रिया व प्रशिक्षण पूर्ण होऊन प्रत्यक्ष कर्तव्यासाठी २ वर्षानंतर आयुक्तालयास उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे हे मनुष्यबळाची कमतरता भरुन काढण्यासाठी ३ हजार कर्मचारी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसा आदेश काढण्यात आला आहे. या कर्मचार्‍यांची मुदत ११ महिन्यांची राहणार आहे. याबाबत पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी सांगितले, मुंबई पोलीस आयुक्तालयाला अशा प्रकारे मनुष्यबळ भरण्यास मंजुरी मिळाल्याची माहिती झाली आहे. त्यांनी कशा प्रकारे प्रस्ताव पाठविला होता, याची माहिती घेण्यात येईल. पुणे शहर पोलीस आयुक्तालयात नवीन ७ पोलीस ठाण्यांची निर्मिती नजीकच्या काळात होणार आहे. त्यासाठीही नवीन मनुष्यबळाची आवश्यकता लागणार आहे. याचा विचार करुन मुंबईच्या प्रस्तावाप्रमाणे शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.  काही दिवसांपूर्वी सदाशिव पेठेत तरुणीवर कोयत्याने वार करण्यात आला होता. त्यावेळी पेरुगेट पोलीस चौकीत कोणीही पोलीस कर्मचारी उपलब्ध नव्हता. त्यावेळी अपुर्‍या पोलीस कर्मचार्‍यांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. शहर पोलीस दलात ७ हजार पोलीस कर्मचारी असून ८०० पोलीस कर्मचार्‍यांची नुकतीच भरती करण्यात आली आहे. सध्या त्यांचे प्रशिक्षण सुरु आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणेMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र