शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
3
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
4
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
5
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
6
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
8
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
9
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
10
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
11
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
12
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
13
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
14
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
15
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
16
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
17
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
18
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
19
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
20
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 

Pune PMPL : पुण्यात तेजस्विनी बस हळूहळू होतायत गायब; महिला प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 10:20 IST

'पीएमपी’ने महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी ही बससेवा सुरू केली होती.

पुणे : ‘पीएमपी’कडून महिला प्रवाशांसाठी २०१८ मध्ये ‘तेजस्विनी महिला बससेवा’ सुरू करण्यात आली. मात्र, अलीकडच्या काळात या बसेसमध्ये कमालीची घट झाली आहे. परिणामी महिला प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. ‘पीएमपी’ने महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी ही बससेवा सुरू केली होती. मात्र, ही सेवा गेल्या काही दिवसांपासून दिसेनाशी झाली आहे.तेजस्विनी महिला विशेष बससेवा ८ मार्च २०१८ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सुरू करण्यात आल्या. त्यावेळी ‘पीएमपी’ने प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेला या बसमधून महिला मोफत प्रवास करू शकतील असे जाहीर केले होते. महिन्याच्या इतर दिवशीही बसचा ताफा शहरातील रस्त्यांवर सशुल्क तिकिटांसह गर्दीच्या वेळेत कार्यरत राहील, असे सांगण्यात आले होते. ज्यावेळी सेवेचे उद्घाटन करण्यात आले, तेव्हा तेजस्विनी महिला बससेवा शहरातील सर्वांत व्यस्त १९ मार्गांवर सुरू करण्यात आल्या होत्या. सध्याच्या आकडेवारीनुसार केवळ १३ मार्गांवर या बस सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.सुरुवातीचे तेजस्विनी बसचे मार्गस्वारगेट ते येवलेवाडी, स्वारगेट ते हडपसर, अप्पा बळवंत चौक ते सांगवी, म.न.पा. भवन ते लोहगाव, कोथरूड डेपो ते विश्रांतवाडी, कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, कात्रज ते कोथरूड डेपो, हडपसर ते वारजे माळवाडी, भेकराईनगर ते म.न.पा. भवन, हडपसर ते वाघोली (केसनंद फाटा), अप्पर डेपो ते स्वारगेट, अप्पर डेपो ते पुणे स्टेशन बीरआरटी, अप्पर डेपो ते पुणे स्टेशन, म.न.पा. भवन ते आकुर्डी रेल्वेस्टेशन, निगडी ते पुणे स्टेशन (औंध मार्गे), निगडी ते भोसरी, निगडी ते हिंजवडी माण-फेज-३, चिंचवडगाव ते भोसर, चिखली ते डांगे चौक अशा मार्गांवर सेवा सुरू होती.सध्या सुरू असलेले मार्ग असेमार्केट यार्ड डेपो ते पिंपळे गुरव, कात्रज ते महात्मा हाउसिंग बोर्ड, भेकराईनगर ते एनडीए १० क्र. गेट, कोथरूड डेपो ते पुणे स्टेशन, कोथरूड डेपो ते कात्रज, स्वारगेट नटराज स्टॅण्ड ते धारेश्वर मंदिर, शेवाळेवाडी ते कात्रज नागेश्वर विद्यालय, चिखली ते डांगे चौक, गव्हाणे वस्ती, भोसरी ते निगडी टिळक चौक, भक्ती-शक्ती ते मेगा पोलिस फेज -३, पुणे स्टेशन ते पुणे स्टेशन, भेकराईनगर ते भेकराईनगर, एनडीए १० क्र. ते एनडीए १० क्र. गेट. (वर्तुळ मार्ग)‘तेजस्विनीचा तेज होतोय कमी’महिला प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली तेजस्विनी बससेवा देशासाठी एक आदर्श ठरली होती. ८ मार्च २०१८ पासून ८ मार्च २०१९ पर्यंत तेजस्विनी बसमधून प्रतिमहिना २ लाख ३३ हजार, तर वर्षभरात २८ लाख महिलांनी प्रवास केला होता. या वर्षाच्या चालू आकडेवारीनुसार प्रवासी संख्या घटली आहे. २०२४ मध्ये प्रवासी संख्या १७६० पर्यंत आली असून, बस मार्ग १३, तर बस संख्या १५ पर्यंत आली आहे.महिन्याच्या ८ तारखेलाही तिकीटच ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने पीएमपी प्रशासनाने तेजस्विनी बसची सुरुवात करताना दर महिन्याच्या ८ तारखेला महिलांना मोफत प्रवास अशी घोषणा केली होती. मात्र, करोनानंतर ही मोफत सेवा बंद करण्यात आली असून, आता ही बंदच आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याला आठ तारखेला महिलांना मोफत प्रवास ही योजना ‘पीएमपी’ने गुंडाळली असल्याचे दिसून येत आहे.

तेजस्विनी महिला विशेष बस १३ मार्गांवर सुरू आहेत. त्यांच्या ठरलेल्या वेळेनुसार त्या सेवेसाठी धावतात. तसेच त्याव्यतिरिक्त ही बस सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. महिलांचा प्रतिसाद कमी मिळत होता, तसेच अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे मार्ग कमी करण्यात आले.- सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, ‘पीएमपीएल’

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाTrafficवाहतूक कोंडीWomen Reservationमहिला आरक्षणPublic Transportसार्वजनिक वाहतूक