शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

पुणे 'खड्डयात'! महापालिका म्हणते, पावसाळ्यात रस्ते दुरुस्ती अशक्य; २ महिने थांबावेच लागेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 12:03 IST

परिणामी पुणेकरांना आणखी किती दिवस खड्ड्यांतून मार्ग काढत प्रवास करावा लागणार हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे

ठळक मुद्देशहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये झालेली रस्तेखोदाई व गेल्या आठ दिवसातील पावसामुळे शहरातील सर्व रस्ते खड्ड्यात

पुणे : शहरातील रस्त्यावरील खड्डयांच्या साम्राज्याला आम्हीच जबाबदार आहोत, अशी कबुली स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली असून, येत्या पंधरा दिवसात शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करू असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना जाहिर केले आहे. तर दुसरीकडे पाऊस पूर्णपणे उघडल्याशिवाय शहरातील रस्त्यांची दुरूस्ती अशक्य असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे. परिणामी पुणेकरांना आणखी किती दिवस खड्ड्यांतून मार्ग काढत प्रवास करावा लागणार हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे.  

महापालिकेने पाणीपुरवठ्याच्या जुन्या जलवाहिन्या तसेच ड्रेनेजलाईन बदलण्यासाठी व अन्य कारणांसाठी शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये झालेली रस्तेखोदाई व गेल्या आठ दिवसातील पावसामुळे शहरातील सर्व रस्ते खड्ड्यात गेले आहेत. या सर्वांचा त्रास करदात्या पुणेकरांना सहन करावा लागत असून, खड्डेमय रस्त्यांमुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे़ याबाबत स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांना विचारले असता, या खड्डेमय रस्त्याला आम्हीच जबाबदार असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. मध्यवर्ती शहरातील जुन्या ड्रेनेज लाईन बदलण्याचे काम लॉकडाउनमध्ये सुरू करण्यात आले होते. यामुळे रस्त्यांची खोदाई करावी लागली असून, सलग पडलेल्या मोठ्या पावसामुळे दुरूस्त करण्यात आलेले खड्डे पुन्हा उखडले गेले आहेत. मात्र येत्या पंधरा दिवसात सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.  

रस्ते दुरूस्तीला तारखांवर तारखा 

शहरात ड्रेनेज, पाणी पुरवठा, केबलसाठी रस्ते खोदाईची कामे मोठ्या प्रमाणात झाली असून, विशेषत:  शहराच्या मध्यतर्वी भागात म्हणजेच शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्त्यासह अन्य रस्त्यांवर ड्रेनेज, पाईपलाईनची कामे करण्यात आली. परंतु, महापालिका नियमानुसार ३० एप्रिल पर्यंत रस्ते खोदाईलाच परवानगी असते. पण याला नियमाला ठेकेदारांकडून हरताळ फासण्यात आला असून, महापालिकेनेही याकडे दुर्लक्ष केले आहे. दरम्यान पावसाळा सुरू झाल्यानंतर खड्डयांमुळे वाहतुकीची पूर्णत: बोजवारा उडल्याने, संंबंधित ठेकेदारांना १५ जूनपर्यंत सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे पुर्ण करण्याचे आदेश दिल्याचे सत्ताधारी पक्षाने सांगितले. मात्र वरवरची मलमपट्टी केल्याने, या सर्व रस्त्यांवरील संबंधित भाग पूर्णत: धसला असून, सत्ताधाऱ्यांचे खड्डेमुक्त रस्त्यांचे आश्वासन आश्वासनच राहिले आहे. त्यातच आता पुन्हा नव्याने पंधरा दिवसात रस्ते खड्डेमुक्त करू असे आश्वासन देण्यात आले आहे़  

सतत पाऊस सुरू असल्याने खड्डे बुजवणे कठीण 

इतर शहरांच्या तुलनेत पुणे शहरातील रस्ते आजही चांगले आहेत. असे सांगतानाच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी, पावसामुळे शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले ही वस्तुस्थिती असल्याचेही कबुल केले आहे. व सध्या सतत पाऊस सुरू असल्याने खड्डे बुजवणे कठीण जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. महापालिकेकडे खड्डे बुजविण्यासाठीची सर्व यंत्रणा तयार असून, जसा पाऊस उघडीप देईल तशी आम्ही खड्डे बुजविण्याची कार्यवाही त्वरीत करत आहोत. मात्र पाऊस पूर्णपणे उघडल्याशिवाय संपूर्ण रस्तेदुरूस्ती शक्य नसल्याचेही डॉ खेमणार यांनी स्पष्ट केले आहे.  

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसMayorमहापौरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाDamधरण