पुणे, पिंपरी-चिंचवडचा वीज पुरवठा पावसामुळे विस्कळीत; महावितरणकडून ९५ टक्के पुरवठा पूर्ववत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 06:00 PM2020-10-15T18:00:57+5:302020-10-15T18:04:18+5:30

मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला.

Pune, Pimpri-Chinchwad power supply disrupted due to rains; 95% supply from MSEDCL undo | पुणे, पिंपरी-चिंचवडचा वीज पुरवठा पावसामुळे विस्कळीत; महावितरणकडून ९५ टक्के पुरवठा पूर्ववत

पुणे, पिंपरी-चिंचवडचा वीज पुरवठा पावसामुळे विस्कळीत; महावितरणकडून ९५ टक्के पुरवठा पूर्ववत

Next
ठळक मुद्देपावसाने ३१० रोहित्र बाधित : महावितरणने तातडीने वीज पुरवठा केला सुरळीत

पिंपरी : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला बुधवारी पावसाने चांगलेच झोडपले. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला. तर काही ठिकाणचा वीज पुरवठा खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आला. परिणामी दोन्ही शहरातील ३१० रोहित्रांचा पुरवठा विस्कळीत झाला. यातील ९५ टक्के वीज पुरवठा गुरुवारी सकाळी पर्यंत पूर्ववत करण्यात यश आले.

मुसळधार पावसाने धानोरी, नगररस्ता, लोहगाव, वडगावशेरी, विमाननगर, कोंढवा, रास्तापेठ, वानवडी, फातिमानगर, मंगळवार पेठ, एनआयबीएम रोड, वारजेचा काही भाग, सिंहगड रोड, धायरी, शिवणे, धायरी, मार्केटयार्ड, बिबवेवाडी, आंबेगाव, कात्रज, सहकारनगर, पर्वती, पेशवे पार्क, स्वारगेट, हडपसर, हांडेवाडी, पिसोळी, पंचवटी, पाषाण, खराळवाडी, पिंपळे सौदागर, जुनी सांगवी, ताथवडे, पिंपळे सौदागर, देहू रोड, चऱ्होली, रावेत, चिखली, थेरगाव, दापोडी, हिंजवडी परिसरातील झाडे व मोठ्या फांद्या वीजयंत्रणेवर पडल्याने तसेच पावसाचे पाणी साचल्याने वीजयंत्रणेत बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित झाला. अनेक सोसायट्यांमध्ये तसेच फिडर पिलरमध्ये पाणी साचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून काही रोहित्रांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. या सर्व भागातील बहुतांश वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. तर वीजपुरवठ्यासंबंधी ग्राहकांच्या वैयक्तिक तक्रारी निवारणाचे कामे सुरु असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, काही भागात व सोसायट्यांमध्ये अद्यापही पावसाचे पाणी साचलेले असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून संबंधीत रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. पावसाचा जोर ओसरल्यानंतर तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याचे कामे सुरु करण्यात आले. यात बुधवारी रात्रीपासून ते सकाळी उशिरापर्यंत महावितरणचे अभियंते व जनमित्रांनी मुसळधार पावसाशी तोंड देत दुरुस्तीची कामे केली. बहुतांश ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना यश आले. 

Web Title: Pune, Pimpri-Chinchwad power supply disrupted due to rains; 95% supply from MSEDCL undo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.