शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

'फुले' सिनेमा जसा आहे तसा प्रदर्शित व्हावा; प्रकाश आंबेडकरांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 13:03 IST

प्रकाश आंबेडकरांचा सेन्सर बोर्डावर संताप, आंदोलनाचा दिला इशारा

पुणे - महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित आणि प्रतीक गांधी व पत्रलेखा यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'फुले' हा आगामी सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सिनेमातील काही दृश्यांवर सेन्सर बोर्डाने आक्षेप घेतल्यामुळे या चित्रपटाची प्रदर्शन तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. या निर्णयावरून सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त फुलेवाड्यात आयोजित कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही यावर संताप व्यक्त केला. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "सेन्सर बोर्डमध्ये वेगवेगळे मान्यवर आहेत. समाजावर परिणाम होईल का याची तपासणी केली जाते, पण संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे. चित्रपटातून कुठे तेढ निर्माण होणार नाही, हे पाहणं महत्त्वाचं आहे."

ते पुढे म्हणाले, सेन्सर बोर्डला विरोध करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. जर सेन्सर बोर्ड आपला विरोध कायम ठेवणार असेल, तर त्या बोर्डाच्या सदस्यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. महात्मा फुलेंचं वाङ्मय सरकारनेच प्रकाशित केलं आहे, त्यावर आधारित सीन काढायला सांगणं म्हणजे विचारस्वातंत्र्यावर गदा आणणं आहे. प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट शब्दांत सेन्सर बोर्डचा निषेध करत म्हटलं, चित्रपटातील सीन हे समग्र वाङ्मयावर आधारित आहेत. जर सेन्सर बोर्डाने लावलेली कात्री काढली नाही, तर आम्ही त्यांच्या कार्यालयावर आंदोलन करू. एकीकडे सरकार अभिवादन करतं, तर दुसरीकडे फुले यांच्या कार्यावर आधारित सिनेमाला विरोध करतं हा विरोधाभास थांबला पाहिजे. 

मुख्यमंत्र्यांना दिलं आवाहन आंबेडकरांनी राज्य सरकारला थेट आव्हान देत म्हटलं, मुख्यमंत्री एकीकडे महात्मा फुलेंना अभिवादन करतायत आणि दुसरीकडे त्यांच्या कार्यावर आधारित चित्रपटाला विरोध होत असेल, तर सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करावी.  'फुले' सिनेमा जसा आहे तसा प्रदर्शित व्हावा, अशी मागणी करत प्रकाश आंबेडकरांनी आंदोलनाचा इशाराही दिला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMahatma Phule Wadaमहात्मा फुले वाडाmarathiमराठी