शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणाचा " पुणे पॅटर्न " राज्यात राबविणार : आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 21:15 IST

कार्बन न्यूट्रल शहर बनविणार

ठळक मुद्देशहरात इलेक्ट्रीक आणि जैव इंधनावरील बसची संख्या वाढविण्यात येईलसौर ऊर्जेचा वापर आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत केली जाईलकोणत्याही शहराचा शाश्वत विकास करायचा झाल्यास पर्यावरण हानी होणार नाही याची दक्षता

पुणे : पुण्यामधे ओला-सुका कचरा वेगळा करण्याचा प्रयोग यशस्वी झाला असून, कापडी पिशव्या वापरण्यांची पुणेकरांची सवय आहे. त्या शिवाय घनकचरा व्यवस्थापनही चांगले सुरु आहे. शहरात इलेक्ट्रीक आणि जैव इंधनावरील बसची संख्या वाढविण्यात येईल. त्यामाध्यमातून ''कार्बन न्यूट्रल शहर '' म्हणून ' पुणे पॅटर्न ' राज्यभर प्रस्थापित करणार असल्याची माहिती पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी दिली. पुणे इंटरनॅशनल सेंटर येथे शहराला २०३० पर्यंत कार्बन न्यूट्रल शहर बनविण्याच्या विषयावर ठाकरे यांनी ज्येष्ठ अर्थ शास्त्रज्ञ विजय केळकर आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्याशी संवाद साधला. प्रा. अमिताव मलिक यांनी ‘मेकींग पुणे मेट्रोपोलिटन रिजन कार्बन न्यूट्रल बाय-२०३०’ या विषयावर सादरीकरण केले. पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरीटीचे (पीएमआरडीए) आयुक्त विक्रम कुमार या वेळी उपस्थित होते.ठाकरे म्हणाले, पुणेकर हे पर्यावरण प्रेमी आहेत. त्यांना सायकल चालविण्याची देखील सवय आहे. तसेच, बांबूचे टूथ ब्रश आणि कापडी पिशव्या वापरातही ते आघाडीवर आहेत. ओला-सुका कचरा वेगळा केला जातो. त्यामुळे पुणेकर २०३० नव्हे तर २०२५ पर्यंतच शहराला कार्बन न्यूट्रल करतील. त्यासाठी शहरामधे इलेक्ट्रीक बस आणि जैव इंधनावरील बस चालविण्यात येईल. सौर ऊर्जेचा वापर आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत केली जाईल. या कामी पुणे राज्याला दिशा दाखवू शकते.  याशिवाय २०२०, २०२५ साल आणि २०३० साला पर्यंत काय करायचे याचा आढावा वेळोवेळी घेतला जाईल. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. तसेच, पर्यटनाच्या दृष्टीने देखील काय करता येईल. जगभरातील प्रवासी येथे कसे आकृष्ट होतील, हे पाहिले जाईल. प्रत्येक महिन्यामधे या कामाचा आढावा घेणार असल्याचे ठाकरे म्हणाले.     --नदीकाठचा विकास अभ्यासानंतर रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट (नदीकाठ विकास) प्रस्तावाचा विचार अभ्यासानंतर करण्यात येईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याबाबत निर्णय घेतील. कोणत्याही शहराचा शाश्वत विकास करायचा झाल्यास पर्यावरण हानी होणार नाही याची दक्षता घेऊन करायला हवा. त्याचा विचार करुनच रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट प्रस्ताव राबविण्यात येईल, अशी माहिती वन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.  

 

टॅग्स :PuneपुणेAaditya Thackerayआदित्य ठाकरेenvironmentपर्यावरणState Governmentराज्य सरकार