'पुणे-ओकायामा मैत्री उद्यान हे पुणे व जपानच्या संस्कृतीचे प्रतीक'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2018 02:23 PM2018-02-02T14:23:31+5:302018-02-02T14:24:33+5:30

पु.ल देशपांडे उद्यानातील पुणे -ओकायामा मैत्री उद्यान हे पुणे व जपानच्या संस्कृतीचे प्रतीक आहे. पुण्यात बाहुलीचे कायमस्वरूपी प्रदर्शन संग्रहालय उभारण्याची इच्छा आहे.

Pune-Okayama Maitri Garden is a symbol of culture of Pune and Japan. | 'पुणे-ओकायामा मैत्री उद्यान हे पुणे व जपानच्या संस्कृतीचे प्रतीक'

'पुणे-ओकायामा मैत्री उद्यान हे पुणे व जपानच्या संस्कृतीचे प्रतीक'

googlenewsNext

 

पुणे- पु.ल देशपांडे उद्यानातील पुणे -ओकायामा मैत्री उद्यान हे पुणे व जपानच्या संस्कृतीचे प्रतीक आहे . पुण्यात बाहुलीचे कायमस्वरूपी प्रदर्शन
संग्रहालय उभारण्याची इच्छा आहे . ते लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.
पुणे महापालिकेतर्फे सिंहगड रस्त्यावरील उभारलेल्या पु . ल . देशपांडे उद्यानांमधील पुणे -ओकायामा मैत्री उद्यानाचा ( जापनीज गार्डन )
शुक्रवारी १२ वर्धापनदिन होता.असोसिएशन आॅफ फ्रेंड्स आॅफ जपान , पुणे व पुणे महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे आज सकाळी ७ वाजता
वर्धापनदिनानिमित्त उद्यानाचा वाढदिवस आयोजित केला होता. महापौर टिळक यांच्या हस्ते केक कापून उद्यानाचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी  असोसिएशन आॅफ फ्रेंड्स आॅफ जपान ,पुणेचे अध्यक्ष समीर खळे ,समन्यवयक श्रीमती स्मिता  भागवत , जपानमधील वाकायामा स्टेटचे प्रमुख
सेईझो त्सुजी ,वाकायमा स्टेटचे प्रतिनिधी शिंजी आराई , ताकाओ ईईझावा, योजी यामासकी, नगरसेविका अनिता कांबळे , पुणे महापालिकेच्या उद्यान
विभागाचे मुख्य अधीक्षक राजेंद्र  घोरपडे ,अधीक्षक संतोष कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समीर खळे यांनी  केले .
यावेळी महापौरांनी व खळे यांनी सर्वांना केक देऊन वाढदिवसाचा आनंद साजरा केला .
पुण़्याला  ऐतिहासिक व पुरातनदृष्ट्या प्रचंड महत्व आहे . अनेक ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यात आले आहे. या वास्तूंचे महत्व लक्षात घेऊन जपानने
पुण्यात पर्यटनास चालना व प्रोत्साहन देण्याचे आवाहन टिळक यांनी जपानमधील वाकायामा स्टेट मधील जपानच्या शिष्टमंडळाला दिले .
जपानमधील वाकायामा स्टेटचे प्रमुख सेईजो त्सुजी म्हणाले, नुकतेच महाराष्ट्र शासन व वाकायामा स्टेट यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी सांस्कृतिक आर्थिक आदानप्रदान विषयक सामंजस्य करार केला आहे . या करारानुसार आम्ही काम करणार आहे . या करारांनंतर आम्ही पुणे शहरास भेट दिली . या परिसरातील काही कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा सुद्धा केली . पुण्यात पर्यटनास प्रोत्साहन देण्यासाठी जपान सरकारकडे आपण प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले .

Web Title: Pune-Okayama Maitri Garden is a symbol of culture of Pune and Japan.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.